IND Vs WI 2nd ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस, टीम इंडिया करणार प्रथम गोलंदाजी

vivek panmand   | CMS
Published : Sep 30, 2026, 03:56 PM IST
IND Vs WI 2nd ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस, टीम इंडिया करणार प्रथम गोलंदाजी

सार

गुवाहाटीमध्ये होत असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या वनडेत कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये वेगवान गोलंदाज आकिब नबी पदार्पण करत असून तो नितीश कुमार रेड्डीची जागा घेईल. तीन मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडिया सध्या १-० ने आघाडीवर आहे.

टीम इंडियाची प्रथम गोलंदाजी; आकिब नबीचं पदार्पण

गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर बुधवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा वनडे सामना खेळवला जात आहे. या मॅचमध्ये भारतीय टीमचा कॅप्टन शुभमन गिलने टॉस जिंकला असून त्याने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

तिरुवनंतपुरममध्ये झालेल्या पहिल्या मॅचमध्ये भारताने २९९ रन्सचं टार्गेट सहज पार केलं होतं. त्या मॅचमध्ये कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या होत्या, तर विराट कोहलीने अवघ्या ८८ बॉल्समध्ये नाबाद १३९ रन्सची तुफानी खेळी केली होती. या विजयामुळे तीन मॅचच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने आधीच १-० अशी आघाडी घेतली आहे.

टॉस जिंकल्यानंतर शुभमन गिल म्हणाला, "आम्ही पहिल्यांदा बॉलिंग करणार आहोत. पिचवर थोडं गवत आहे आणि ते थोडं पॅची वाटतंय. मागच्या मॅचमध्ये आम्ही ज्या प्रकारे कमबॅक केलं, ते खरंच भारी होतं. इथे खूप उकाडा (ह्युमिडिटी) आहे, त्यामुळे आमच्या बॉलर्ससाठी हे एक मोठं चॅलेंज असेल. रोहितसह सर्वच खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. टीममध्ये आम्ही एक बदल केलाय, नितीशच्या जागी नबी आज पदार्पण करत आहे." जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवत आहे.

वेस्ट इंडिजचा कॅप्टन शाई होप म्हणाला, "आम्हीसुद्धा पहिल्यांदा फिल्डिंगच केली असती. टॉस जिंकणं हे ५०-५० असतं, पण आमच्यासाठी चांगली कामगिरी करण्याची ही आणखी एक संधी आहे. आम्हाला काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. पिच तसं चांगलं दिसत आहे."

दोन्ही टीम्सची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर), नमन धीर, रवींद्र जडेजा, आकिब नबी, गुरनूर ब्रार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.

वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): जॉन कॅम्पबेल, केसी कार्टी, शाई होप (विकेटकीपर/कर्णधार), अमीर जांगू, शेरफेन रदरफोर्ड, रोस्टन चेस, कीमो पॉल, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, जेडन सील्स, विटेल लॉवेस.

(हेडलाईन वगळता, या बातमीत एशियनेट न्यूजच्या संपादकीय टीमने कोणताही बदल केलेला नाही आणि ती सिंडिकेटेड फीडमधून प्रकाशित केली गेली आहे.)

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Virat Kohli : 'हे फक्त मोजक्याच लोकांना जमतं'; विराटच्या ऐतिहासिक कामगिरीवर कपिल देव खूश
Rohit Sharma : रोहित शर्मा आता आक्रमक नाही, संयमी झालाय; हा बदल त्याला फायद्याचा ठरेल का?