
India vs Pakistan Super 4 LIVE Cricket Updates Asia Cup 2025: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आज थरारक शिखरावर पोहोचला आहे! क्रिकेटप्रेमींना ज्याची प्रतीक्षा होती, तो सुपर 4 चा हायव्होल्टेज मुकाबला अखेर सुरु झाला आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेकीत विजय मिळवत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. साखळी फेरीतही भारताने पहिली गोलंदाजी करत पाकिस्तानला कमी धावसंख्येवर रोखले होते. त्यामुळे आज पुन्हा एकदा तशीच प्रभावी कामगिरी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
सैम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
भारताची मजबूत गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण यावर आजची मॅच अवलंबून आहे, तर पाकिस्तानची आक्रमक फलंदाजी भारताच्या रणनीतीची परीक्षा घेणार आहे. सुपर 4 मधील हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.