India vs Bangladesh: अनेक अडचणींनंतर टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर जाणार? तारखांवर चर्चा सुरू

vivek panmand   | CMS
Published : Nov 06, 2026, 08:34 PM IST
India vs Bangladesh: अनेक अडचणींनंतर टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर जाणार? तारखांवर चर्चा सुरू

सार

India Tour of Bangladesh 2027: गेल्या वर्षापासून भारतीय क्रिकेट संघाच्या बांगलादेश दौऱ्याची अनेकदा चर्चा झाली, पण दौरा काही झाला नाही. आता पुन्हा एकदा शुभमन गिल आणि टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पण हा दौरा खरंच होणार का, याबाबत अजूनही साशंकता आहे.

India vs Bangladesh: अनेक अडचणी आणि दौरा वारंवार पुढे ढकलल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघ अखेर बांगलादेश दौऱ्यावर जाणार का? २०२७ च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या दौऱ्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रस्तावित वेळापत्रकानुसार, भारतीय संघ बांगलादेशमध्ये तीन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळू शकतो. बीसीसीआय (BCCI) आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण दोन्ही बोर्डांमधील चर्चा सकारात्मक दिशेने सुरू असल्याची माहिती आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास शुभमन गिल (Shubman Gill) आणि टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर जाऊ शकते.

बांगलादेश दौऱ्यासाठी वेळ काढणं कठीण

बीसीसीआय आणि बीसीबीमध्ये चर्चा सुरू असली तरी, या दौऱ्यासाठी योग्य वेळ काढणं थोडं कठीण जाऊ शकतं. कारण, ३ ते ९ जानेवारी २०२७ दरम्यान भारतीय संघ मायदेशात झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर २१ जानेवारीपासून भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) सुरू होईल. त्यामुळे बांगलादेश दौऱ्याचं आयोजन करायचं असेल, तर वेळापत्रकात काही बदल करावे लागतील. केंद्र सरकार बीसीसीआयला बांगलादेशमध्ये संघ पाठवण्याची परवानगी देणार का, हाही एक मोठा प्रश्न आहे. भारत आणि बांगलादेशमधील राजनैतिक संबंध सुधारले तरच केंद्र सरकार या दौऱ्याला हिरवा कंदील दाखवेल. बीसीसीआय सध्या सरकारच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यावरच या दौऱ्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

४ वर्षांनंतर भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर जाऊ शकतो

डिसेंबर २०२२ मध्ये भारतीय क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्यात टीम इंडियाने तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळले होते. आता जानेवारी २०२७ मध्ये, म्हणजे चार वर्षांहून अधिक काळानंतर भारतीय संघ पुन्हा बांगलादेशला जाऊ शकतो. याआधी गेल्या वर्षी जुलैमध्ये भारतीय संघाचा बांगलादेश दौरा पहिल्यांदा पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर यावर्षीही दौऱ्याची शक्यता होती, पण तोही झाला नाही. आता पुढच्या वर्षीचा प्रस्तावित दौरा तरी होणार का, याबाबत अजूनही शंका आहे.

PREV

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

Read more Articles on

Recommended Stories

Vaibhav Sooryavanshi: १५ वर्षांचा वैभव बनला बिहारचा कॅप्टन, सोशल मीडियावर रंगली चर्चा
Hardik Pandya IPL Trade: हार्दिक पांड्या पंजाब किंग्समध्ये जाणार? 'नवा तुफान' पोस्टचं खरं सत्य