
IND vs PAK Asia Cup 2025 : एशिया कप २०२५ च्या सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ विकेट्सने धुवून काढले आणि दुसरा विजय मिळवला. भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. सामन्यानंतर, कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी हा विजय भारतीय सैन्याला समर्पित केला. सूर्याने पत्रकार परिषदेत सांगितले की हा विजय आपल्या देशाच्या सैनिकांना समर्पित करतो.
भारत आणि पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार घालण्याची मागणी होत होती. देशभरात लोकांमध्ये संताप होता, तरीही सामना खेळवण्यात आला आणि भारताने पाकिस्तानला हरवले. या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाले,
तुम्ही हा सामना जिंकू इच्छिता आणि जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुमच्याकडे एक तयार बॉक्स असतो जो मी नेहमीच टिक करू इच्छितो. तिथे टिक करून खेळणे आणि शेवटपर्यंत फलंदाजी करणे. संपूर्ण संघासाठी आम्हाला वाटते की हा फक्त एक खेळ आहे. आम्ही सर्व विरोधकांसाठी समान तयारी करतो. काही महिन्यांपूर्वी असेच घडले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाने सूर दिला. मी नेहमीच फिरकी गोलंदाजांचा चाहता आहे, कारण ते सामन्याच्या मध्यभागी नियंत्रण ठेवतात. फक्त काही सांगायचे होते.
आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळी पडलेल्या कुटुंबियांसोबत आहोत आणि हा विजय आपल्या देशाच्या सैनिकांना समर्पित करतो.
या सामन्याकडे पाहिले तर पाकिस्तानच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकांत ९ बाद १२७ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी थैमान घातले. कुलदीप यादवने ३ बळी घेतले. अक्षर आणि जसप्रीत बुमराहने २-२ बळी घेतले. हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्तीला १-१ यश मिळाले. १२८ धावांचा पाठलाग करताना भारताने १५.५ षटकांत ३ बाद करून विजय मिळवला. सूर्यकुमार यादवने ४७ धावांची नाबाद खेळी केली, त्याशिवाय अभिषेक शर्माने १२ चेंडूत ३३ धावा केल्या.