
मुंबई : मुंबईत झालेल्या SIR विरोधी आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल अभिनेता इम्रान खानने बिनशर्त माफी मागितली आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याने ही माफी मागितली. OCI (ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया) कार्डधारक असलेल्या इम्रान खानला भारतात आंदोलनात सहभागी होण्याचा कोणताही अधिकार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने त्याला फटकारले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात CJP ने पुकारलेल्या आंदोलनात तो सहभागी झाला होता. यानंतर FRRO ने त्याला भारत सोडण्याची नोटीस बजावली होती. या नोटीसविरोधात इम्रानने न्यायालयात धाव घेतली होती. OCI कार्डधारक आणि भारतीय नागरिक यांना समान वागणूक देता येणार नाही, असेही न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले.
आपण आयुष्यातील बहुतांश काळ भारतातच घालवला आहे आणि केवळ अमेरिकेत जन्म झाल्यामुळे तिथले नागरिकत्व मिळाले आहे, असा युक्तिवाद इम्रान खानने केला. मात्र, एखाद्या भारतीय नागरिकाने दुसऱ्या देशात जाऊन असे आंदोलन केले असते, तर त्याला तात्काळ भारतात परत पाठवले असते, असे न्यायालयाने सुनावले. इम्रानने माफी मागितल्यामुळे न्यायालयाने त्याची बाजू ऐकून घेण्यासाठी आणखी वेळ दिला आहे. आता या याचिकेवर पुढच्या शनिवारी पुन्हा सुनावणी होईल. तोपर्यंत इम्रान खानला देश सोडण्याची गरज नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
१० ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या CJP च्या आंदोलनात तो सहभागी झाला होता. त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याची नोटीस दिली होती. त्यानंतरच त्याने उच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू केली. पुढच्या शनिवारी होणाऱ्या सुनावणीनंतरच यावर अंतिम निर्णय होईल.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.