भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वाल एक स्थान खाली सरकून चौथ्या स्थानावर आला आहे, तर जो रूट पहिल्या, केन विल्यमसन दुसऱ्या आणि हॅरी ब्रुक तिसऱ्या स्थानावर आहेत.
दुबई: आयसीसी कसोटी क्रमवारीत भारतीय स्टार खेळाडू विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्माला धक्का बसला आहे. आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत कोहली आणि रोहित टॉप २० मधून बाहेर पडले आहेत. विराट कोहली आठ स्थानांची घसरण होऊन २२० व्या स्थानावर घसरला आहे, तर रोहित दोन स्थानांची घसरण होऊन २६ व्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील खराब कामगिरीमुळे कोहली आणि रोहितला हा धक्का बसला आहे.
दरम्यान, ऋषभ पंत आणि शुभमन गिल हे फलंदाजी क्रमवारीत फायदा मिळवणारे दोन खेळाडू आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटीत दोन्ही डावात अर्धशतक झळकावणाऱ्या ऋषभ पंतने पाच स्थानांची झेप घेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे, तर शुभमन गिल चार स्थानांनी सुधारून सोळाव्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वाल एक स्थान खाली सरकून चौथ्या स्थानावर आला आहे, तर जो रूट पहिल्या, केन विल्यमसन दुसऱ्या आणि हॅरी ब्रुक तिसऱ्या स्थानावर आहेत.
न्यूझीलंडचा डॅरिल मिचेल हा फायदा मिळवणारा आणखी एक खेळाडू आहे. मिचेल आठ स्थानांनी सुधारून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. कसोटी गोलंदाजी क्रमवारीत रविचंद्रन अश्विन एक स्थान गमावून पाचव्या स्थानावर घसरला आहे, तर मुंबई कसोटीत १० बळी घेणारा रवींद्र जडेजा दोन स्थानांनी सुधारून अश्विनच्या मागे सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. जसप्रीत बुमराहने तिसरे स्थान कायम ठेवले आहे, तर हेजलवुड दुसऱ्या आणि कागिसो रबाडा पहिल्या स्थानावर आहेत. मुंबई कसोटीत १२ बळी घेणारा अजाज पटेल १२ स्थानांनी सुधारून २२ व्या स्थानावर पोहोचला आहे.
ऑलराउंडर क्रमवारीत रवींद्र जडेजाने पहिले स्थान कायम ठेवले आहे, तर आर अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. अक्षर पटेल आठव्या स्थानावर आहे.