
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याने नुकतीच एका जबरा फॅनची भेट घेतली. रवी कुमार रावत असं या फॅनचं नाव आहे. आपल्या लाडक्या क्रिकेटरला भेटण्यासाठी रवीने लखनौ ते मुंबई आणि तिथून थेट बंगळुरूपर्यंतचा प्रवास पायीच केला.
हार्दिक पंड्या सध्या बंगळुरूच्या बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये रिहॅब करत आहे. तो आपल्या घोट्याच्या दुखापतीतून सावरत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अनधिकृत तीन सामन्यांच्या वनडे सीरिजसाठी इंडिया ए टीममध्ये त्याची निवड झाली होती. पण दुखापतीमुळे त्याने माघार घेतली आणि त्याचं कमबॅक थोडं लांबणीवर पडलं.
या वर्षी मे महिन्यापासून हार्दिक क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. रिकव्हरीसाठी तो बंगळुरूच्या बीसीसीआय CoE मध्ये थांबला आहे. रवीने हार्दिकचं लोकेशन ट्रॅक केलं आणि त्याला भेटण्यासाठी हा मोठा पायी प्रवास सुरू.
हार्दिक पंड्याला भेटण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रवी कुमार रावतने खूप कठीण प्रवास केला. रवीने लखनौवरून पायी चालायला सुरुवात केली आणि जवळपास १४०० किलोमीटर चालून तो मुंबईत पोहोचला. पण मुंबईत आल्यावर त्याला समजलं की हार्दिक रिकव्हरीसाठी बंगळुरूला गेला आहे.
प्लॅन बदलला तरी रवीने हार मानली नाही. त्याने मुंबई ते बंगळुरू असा आणखी ९९० किलोमीटरचा पायी प्रवास सुरू केला. अखेर हा जबरा फॅन बंगळुरूच्या बीसीसीआय CoE मध्ये पोहोचला आणि ज्याच्यासाठी त्याने अर्धा देश पायी पालथा घातला, त्या हार्दिकची त्याने प्रत्यक्ष भेट घेतली.
सोशल मीडियावर, विशेषतः एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर या भेटीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात हार्दिक या फॅनसोबत खूप प्रेमाने बोलताना दिसत आहे. रवीच्या हातात एक पोस्टर आणि पाठीवर सामानाची बॅग होती. हार्दिकने त्याला परतीचं फ्लाईट तिकीट दिलं, जेणेकरून त्याला पुन्हा असा थकवणारा प्रवास करावा लागू नये.
हार्दिकने या फॅनला 'कुछ चाहिये तो बता देना' असंही सांगितलं. त्याच्या या साधेपणाने इंटरनेटवर सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.
Hardik Pandya met a fan who walked all the way from Mumbai to Bengaluru just to meet him, Hardik also arranged his return ticket. ❤️ https://t.co/dRSjihsOHW
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 20, 2026
भारताच्या २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप प्लॅन्सचा भाग होण्यासाठी हार्दिक सध्या बंगळुरूमध्ये फिटनेसवर काम करत आहे. आपला जुना फॉर्म आणि फिटनेस परत मिळवण्यासाठी तो कोणतीही कसर सोडत नाहीये.
या मेगा टूर्नामेंटच्या पार्श्वभूमीवर, पूर्णपणे फिट होऊन टीम इंडियासाठी पुन्हा एकदा मॅच-विनिंग परफॉर्मन्स देण्यावर त्याचं पूर्ण लक्ष आहे.
लखनौ ते बंगळुरू असा जवळपास २३९० किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या फॅनला भेटून हार्दिकने त्याला फ्लाईटचं तिकीट दिलं. या घटनेनंतर सोशल मीडियावर, विशेषतः एक्सवर लोकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. क्रिकेट फॅन्स हार्दिकच्या या चांगुलपणाचं आणि खिलाडूवृत्तीचं खूप कौतुक करत आहेत.
अनेकांनी एक्सवर पोस्ट करत हार्दिकच्या या कृतीला सलाम केला आहे. काहींनी याला क्रिकेटच्या पलीकडचं त्याचं खरं व्यक्तिमत्त्व म्हटलंय, तर काहींनी फ्लाईट तिकीट देण्याच्या त्याच्या निर्णयाला एक हृदयस्पर्शी कृती मानलं आहे.
काही फॅन्सनी रवीच्या या २३९० किलोमीटरच्या जिद्दीचंही कौतुक केलं आहे. एका युझरने या प्रवासाला 'सिरीयस कमिटमेंट' म्हटलंय. तर दुसऱ्या एका युझरने हार्दिकचं कौतुक करताना लिहिलंय, 'खरे मोठेपण फक्त रन्स आणि रेकॉर्ड्समध्ये नसतं, तर जर्सीमागे असलेल्या हृदयात असतं.'
@mufaddal_vohra You can’t take out the sportsmanship from a true sportsman.
Hardik bhai 🫡
— Manas Dutta 🇮🇳 (@manas__dutta) October 20, 2026
@mufaddal_vohra Walked Mumbai to Bengaluru just to meet him and Hardik sorted his return ticket himself. Forget the sixes for a minute, this is the stuff that actually stays with you.
— Sunny Singh (@SunnyDecodes) October 20, 2026
@mufaddal_vohra Walking nearly 1,000 km to meet your hero is serious commitment. Booking his ticket home is a classy way of saying "I saw you."
— Indian CA (@taha786110) October 20, 2026
@mufaddal_vohra Real greatness isn’t just about runs and records, it’s about the heart behind the jersey. ❤️👏 Hardik won a fan’s heart for a lifetime! 💙
— W𝐢𝐬𝐝𝐨𝐦 Of 𝘽𝙝𝙖𝙧𝙖𝙩 (@WisdomofBharat1) October 20, 2026
@mufaddal_vohra Great person ever hardik Pandya ❤️
— CricketIndian_🇮🇳 (@CricketIndian_) October 20, 2026
@mufaddal_vohra Respect to both the fan and Hardik 🙌✨
— RAHUL KUMAR (@CricCrazyRahull) October 20, 2026
It's approximately 1,000 Kilometre, that's insane from Hardik Pandya Fan 👏🏻
— Ajay Jadeja (@AjayJadeja171) October 20, 2026
Fame is having millions of fans.
Character is caring about the one standing in front of you. ❤️
Hardik Pandya won hearts today.
— Gaurav Patel (@GauravPatel__01) October 20, 2026
❤️👏 Hardik Pandya won hearts once again! A fan walked all the way from Mumbai to Bengaluru just to meet him, and Hardik not only met him but also arranged his return ticket. Pure humanity! 🥹❤️
#tejran #sali #paobc #bbvipal5
— Inaya Qadir (@InayaQadir78886) October 20, 2026
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या टी-२० आणि वनडे टीममध्ये हार्दिक पंड्याला संधी देण्यात आली नव्हती. वर्कलोड मॅनेजमेंट आणि रिकव्हरी प्रोग्राम पूर्ण करण्यासाठी सिलेक्टर्सनी त्याला पुरेसा वेळ दिला आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.