RCB vs CSK: CSK चा 'फ्लॉप' शो! पराभवाची हॅट्ट्रिक आणि विस्कळीत रणनीती; चेन्नईच्या 'पॅकअप'ची ही आहेत 5 मुख्य कारणं

Published : Apr 05, 2026, 11:39 PM IST
RCB vs CSK

सार

RCB vs CSK: चेन्नई सुपर किंग्ससमोर २५१ रन्सचं मोठं आव्हान आहे. ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी डावाची सुरुवात केली आहे. एवढ्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग चेन्नई करू शकेल का? जाणून घ्या प्रत्येक अपडेट.

RCB vs CSK: आयपीएलच्या रणांगणात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा 43 धावांनी धुव्वा उडवला. आरसीबीच्या ऐतिहासिक 250 धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना चेन्नईचा डाव अवघ्या 207 धावांत आटोपला. या पराभवासोबतच चेन्नईने पराभवाची 'हॅट्ट्रिक' पूर्ण केली असून, यंदाच्या हंगामातील त्यांचा प्रवास आता खडतर झाला आहे. नेमकी कुठे चुकली 'यलो आर्मी'? जाणून घेऊयात पराभवाची पाच प्रमुख कारणं.

1. गोलंदाजीची सपशेल शरणागती

चेन्नईची गोलंदाजी यंदाच्या मोसमात सर्वात कमकुवत दुवा ठरली आहे. राजस्थानविरुद्ध साधे 128 धावांचे रक्षण न करू शकलेले गोलंदाज, आरसीबीविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत पूर्णपणे निष्प्रभ ठरले. आजच्या सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी तब्बल 250 धावा कुटल्या, यावरूनच चेन्नईच्या गोलंदाजीची धार किती बोथट झाली आहे हे स्पष्ट होते.

2. फलंदाजीतील सातत्याचा अभाव

पहिल्या सामन्यात फलंदाजी कोसळल्यानंतर दुसऱ्या सामन्यात 200 धावांचा टप्पा ओलांडला, तरीही विजय मिळाला नाही. आजच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पुन्हा एकदा फलंदाजी 'फ्लॉप' ठरली. ठराविक अंतराने विकेट्स गमावल्यामुळे चेन्नईला कधीही सामन्यावर पकड मिळवता आली नाही.

3. संजू सॅमसनची खराब फॉर्म

ट्रेड विंडोद्वारे संघात सामील झालेला स्टार खेळाडू संजू सॅमसन कडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, टी-20 वर्ल्ड कप गाजवलेला संजू आयपीएलमध्ये सपशेल अपयशी ठरला आहे. राजस्थानविरुद्ध 6, पंजाबविरुद्ध 7 आणि आज आरसीबीविरुद्ध केवळ 9 धावांवर तो बाद झाला. मधल्या फळीतील त्याचे अपयश चेन्नईला महाग पडत आहे.

4. ऋतुराजच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाड अद्याप आपली छाप पाडू शकलेला नाही. मैदानात योग्य रणनीतीचा अभाव आणि स्वतः फलंदाजीतही अपयशी ठरत असल्यामुळे त्याच्यावर दडपण वाढत आहे. निर्णायक क्षणी योग्य बदल करण्यात तो कमी पडताना दिसत आहे.

5. लिलावातील चुका आणि संघ बांधणी

चेन्नईने लिलावात 'झेन्जी' (Gen-Z) खेळाडूंवर भर दिला खरा, पण संघात योग्य ताळमेळ बसताना दिसत नाहीये. अनुभवाची कमतरता आणि खेळाडूंच्या भूमिकेबाबत स्पष्टता नसल्यामुळे मैदानात सांघिक कामगिरी होताना दिसत नाही.

प्ले-ऑफचे गणित काय?

सलग तीन पराभवांनंतर चेन्नईसाठी आता 'करो या मरो'ची स्थिती आहे. उर्वरित 11 पैकी किमान 8 सामने जिंकणे आता अनिवार्य आहे. खराब नेट रनरेटमुळे 7 विजय कदाचित पुरेसे ठरणार नाहीत, त्यामुळे प्रत्येक सामना आता फायनलसारखा खेळावा लागणार आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

IPL Super Sunday : आज डबल धमाका! दुपारी LSG vs SRH, तर संध्याकाळी RCB vs CSK, जाणून घ्या सबकूछ
RR vs GT: बिश्नोईचे 'चौकार' अन् देशपांडेचा तो शेवटचा ओव्हर; राजस्थानचा गुजरातवर थरारक विजय!