'क्रिकेटर्सना नॉन-व्हेज चहा पाजत होतात का?' हायकोर्टाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला झापलं!

Published : Aug 26, 2026, 11:38 AM IST
'क्रिकेटर्सना नॉन-व्हेज चहा पाजत होतात का?' हायकोर्टाने मुंबई क्रिकेट असोसिएशनला झापलं!

सार

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) कॅन्टीनमध्ये झुरळं आणि माश्या आढळल्याने मुंबई उच्च न्यायालयाने संस्थेला चांगलेच फटकारले आहे.

मुंबई : क्रिकेटच्या दुनियेतून एक धक्कादायक आणि तितकीच विचित्र बातमी समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) कॅन्टीनमधील अस्वच्छतेबद्दल ऐकून मुंबई उच्च न्यायालय चांगलेच संतापले. किचनमध्ये झुरळं आणि माश्यांचा सुळसुळाट पाहून, 'खेळाडूंना आपण 'नॉन-व्हेज चहा' पितोय याची कल्पना होती का?' असा उपरोधिक प्रश्न कोर्टाने विचारला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पाच रेस्टॉरंट्सचा परवाना महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) नुकताच निलंबित केला होता. एफडीएच्या अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता, झुरळांचा वावर आणि निसरडी जमीन आढळली होती. या कारवाईविरोधात MCA ने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

कोर्टाचा 'गुगली' प्रश्न

सुनावणीदरम्यान, MCA च्या वकिलांनी बाजू मांडताना सांगितले की, "रेस्टॉरंट बंद असल्याने आम्ही खेळाडूंना साधा चहासुद्धा देऊ शकत नाही." यावर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने एफडीएच्या अहवालाचा हवाला देत सणसणीत टोला लगावला. ते म्हणाले, "एफडीएच्या रिपोर्टनुसार तिथे झुरळं आणि माश्या आहेत. मग अशा परिस्थितीत, खेळाडूंना आपण 'नॉन-व्हेज चहा' (Non-Veg Tea) पित आहोत हे माहीत होते का?"

एफडीएच्या रिपोर्टमध्ये काय होतं?

-किचनमध्ये शेकडो झुरळं आणि माश्या आढळल्या.
-किचनमधील जमीन अत्यंत घाणेरडी आणि निसरडी होती.
-अन्न सुरक्षेच्या नियमांना पूर्णपणे केराची टोपली दाखवण्यात आली होती.

हायकोर्टाचा आदेश

न्यायालयाने MCA ला कठोर शब्दांत फटकारले आहे. गुरुवारी एफडीए अधिकारी पुन्हा तपासणी करण्यापूर्वी कॅन्टीनचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचे निर्देश दिले आहेत. स्वच्छतेचे निकष न पाळल्यास परवाना रद्द करण्याचा अधिकार एफडीएला आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. सध्या सोशल मीडियावर हायकोर्टाची ही 'नॉन-व्हेज चहा' वाली टिप्पणी प्रचंड व्हायरल होत असून, क्रिकेट चाहते MCA विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

PREV

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

Read more Articles on

Recommended Stories

Virender Sehwag : 'यावेळी आपण...': 2027 च्या वनडे वर्ल्ड कपबद्दल वीरेंद्र सेहवागची मोठी भविष्यवाणी
Abhishek Sharma : वेस्ट इंडिजविरुद्ध अभिषेक शर्माचा धमाका; सूर्यकुमार यादवचा रेकॉर्ड मोडला