
AUS vs ENG T20I: मिचेल मार्शने 49 चेंडूत दणदणीत शतक ठोकलं. त्याने 57 चेंडूत 119 धावांची खेळी केली. पण स्वतः कर्णधार असूनही एवढी जबरदस्त खेळी करूनही ऑस्ट्रेलियाला सामना आणि मालिका गमवावी लागली. रविवारी सिडनीमध्ये 182 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी ओपनिंगला आलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनर आणि कर्णधार मार्शने 57 चेंडूत 119 धावांची अविश्वसनीय खेळी केली. ऑस्ट्रेलियन कर्णधाराने 9 षटकार आणि 9 चौकार लगावले. पण तरीही ऑस्ट्रेलियाचा 7 धावांनी पराभव झाला. पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेत इंग्लंडने मालिका जिंकली. वनडेनंतर आता एक सामना बाकी असतानाच हॅरी ब्रूकच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर टी-20 मालिका जिंकली आहे.
सिडनीमध्ये मिचेल मार्श वगळता ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. ऑस्ट्रेलियाच्या डावातील 68 टक्के धावा एकट्या मार्शच्या बॅटमधून आल्या. इतर कोणताही ऑस्ट्रेलियन फलंदाज 20 धावांचा टप्पाही ओलांडू शकला नाही. ओपनर जॅक फ्रेझर मॅकगर्कसह दोघे शून्यावर बाद झाले. सॅम हार्पर (18), निखिल चौधरी (12), टीम डेव्हिड (12) हेही अपयशी ठरले. अखेरीस 20 षटकात ऑस्ट्रेलियाने 7 गडी गमावून 174 धावा केल्या. ब्रूकच्या संघाने 7 धावांनी विजय मिळवला.
मार्शचं दणदणीत शतक, पण ऑस्ट्रेलियाचा पराभव
How good! Mitch Marsh brings up a massive ton at the SCG ❤️ #AUSvENG https://t.co/8re14m0ZLR
— cricket.com.au (@cricketcomau) November 29, 2026
त्याआधी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 7 गडी गमावून 182 धावा केल्या होत्या. 32 धावांवर 4 विकेट्स गमावल्यामुळे इंग्लंड चांगलाच दबावाखाली होता. पण त्यानंतर जॉर्डन कॉक्स (19 चेंडूत 23), जेम्स कोल्स (33) यांनी संघाला सावरलं. सातव्या क्रमांकावर आलेल्या सॅम करनने 28 चेंडूत अर्धशतक ठोकत संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवलं. शेवटी लियाम डॉसन (14 चेंडूत 23) आणि जेमी ओव्हरटन (9 चेंडूत 20) यांनी उपयुक्त खेळी केली. सामना हरला असला तरी मिचेल मार्शला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.
शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी 12 धावांची गरज होती, इंग्लंड 7 धावांनी जिंकला
Crocombe defends 12 runs in the last over to win the T20I series for England! 🔥
#ENGvAUS #T20 #Cricket https://t.co/NzQauU7gcW
— FanCode (@FanCode) November 29, 2026
विशेष म्हणजे, या टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सलग तीन सामने गमावले आणि मालिकाही गमावली. कॅरारा, ब्रिस्बेन आणि सिडनीमध्ये इंग्लंडने अनुक्रमे 8 विकेट्स, 7 विकेट्स आणि 7 धावांनी विजय मिळवला. बुधवारी कॅनबेरामध्ये होणारा मालिकेचा पाचवा आणि शेवटचा सामना आता फक्त औपचारिकता उरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियात झालेल्या वनडे मालिकेत इंग्लंडने 2-1 असा विजय मिळवला होता.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.