
अंडर-१९ आशिया कपच्या फायनलमध्ये शनिवारी (१४ नोव्हेंबर) ओमानमधील अल अमिरात क्रिकेट मैदानावर भारताचा ओपनर आर्यावीर सेहवागने पाकिस्तानविरुद्ध आपला बेस्ट खेळ दाखवला.
पाकिस्तानने उस्मान खानचे शतक (१०७), अब्दुल कादिरच्या ८० आणि कर्णधार फरहान युसूफच्या ६३ धावांच्या जोरावर ५० षटकांत ३३७/९ अशी मजल मारत भारतासमोर ३३८ धावांचे तगडे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना आर्यावीर सेहवाग आणि कर्णधार लक्ष्य राजेश रायचंदानी यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली आणि पाकिस्तानी गोलंदाजांवर दबाव आणला.
पहिल्या विकेटसाठी सेहवाग आणि रायचंदानीने ९५ धावांची भागीदारी केली. पण नंतर पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज निकाब शफीकच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात सेहवाग ५८ धावांवर आऊट झाला. उस्मान खानने त्याचा कॅच पकडला
भारताचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यावीरने या मोठ्या मॅचमध्ये शानदार ५१ चेंडूत अर्धशतक ठोकलं. हे त्याचं या स्पर्धेतलं चौथं अर्धशतक होतं.
इनिंगच्या सुरुवातीलाच पाकिस्तानच्या अली रझाचा चेंडू त्याच्या उजव्या कोपऱ्याला लागला, पण त्याने वेदना विसरून भारताचा डाव सावरला. १५व्या षटकात आपलं अर्धशतक पूर्ण केल्यावर या १९ वर्षांच्या खेळाडूने एक असं सेलिब्रेशन केलं, जे भारतीय क्रिकेट चाहत्यांना लगेच आठवलं.
सेहवागने आपली बॅट उंचावली आणि नंतर ती मैदानावर ठेवत विराट कोहलीच्या 'लेट माय बॅट डू द टॉकिंग' सेलिब्रेशनची आठवण करून दिली. कोहलीचा चाहता असलेल्या आर्यावीरने २०१८ मध्ये पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटने २५ वे कसोटी शतक झळकावल्यानंतर केलेल्या त्या सेलिब्रेशनची हुबेहूब कॉपी केली.
Aryavir Sehwag with a Virat Kohli-style celebration! 🔥👑
brilliant 51 off 61 balls in the U19 Asia cup final against Pakistan! 👏 https://t.co/3uUi8CAhGO
— Alone Mast (@turrruuu) November 14, 2026
आर्यावीरने आपल्या ६१ चेंडूंच्या खेळीत ९ चौकार मारले आणि तोपर्यंत तो पाकिस्तानी गोलंदाजांसाठी मोठी डोकेदुखी ठरत होता. तो भारताला वेगाने धावा करून देत होता.
कर्णधार रायचंदानीसोबत मोठी भागीदारी उभारण्याचा त्याचा विचार होता, पण १८व्या षटकात निकाब शफीकच्या चेंडूवर तो कॅच आऊट झाला आणि पाकिस्तानला पहिलं यश मिळालं.
वीरेंद्र सेहवागचा मुलगा असला तरी आर्यावीरने या स्पर्धेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये कूचबिहार करंडक स्पर्धेत दिल्लीसाठी २९७ धावांची खेळी आणि अलीकडेच विनू मांकड करंडक स्पर्धेत चंदीगडविरुद्ध १४३ चेंडूत १७३ धावा फटकावल्यामुळे तो चर्चेत आला होता. त्यानंतर अंडर-१९ आशिया कप ही त्याची पहिली मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या युथ एकदिवसीय मालिकेत त्याने २८, ४७ आणि ३४ अशा धावा करत १०३.८० च्या स्ट्राईक रेटने १०९ धावा केल्या होत्या. पण २०२६ च्या अंडर-१९ आशिया कपमध्ये तो भारताचा स्टार फलंदाज ठरला.
या स्पर्धेत त्याने नेपाळ, पाकिस्तान, यूएई, अफगाणिस्तान (सेमीफायनल) आणि फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध अनुक्रमे ७०, २२, १६०, ५१ आणि ५८ धावा केल्या. पाच डावांत त्याने ९०.२५ च्या सरासरीने एक शतक आणि तीन अर्धशतकांसह ३६१ धावा केल्या.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.