
गॉल: भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी ३७२ धावांचं लक्ष्य मिळालं आहे. पहिल्या डावात १७८ धावांची मोठी आघाडी घेतल्यानंतर, भारतीय संघ दुसऱ्या डावात फक्त १९३ धावांवर ऑल आऊट झाला. भारताकडून ऋषभ पंतने ६९ चेंडूत सर्वाधिक ६६ धावा केल्या. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या देवदत्त पडिक्कलने दुसऱ्या डावातही ४४ धावांची चांगली खेळी केली, तर केएल राहुलने ३५ धावांचं योगदान दिलं. या तिघांशिवाय एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. श्रीलंकेकडून असिथा फर्नांडोने ३१ धावांत ४ बळी घेतले, तर प्रभात जयसूर्याने ४३ धावांत ३ गडी बाद केले. लाहिरू कुमाराला दोन बळी मिळाले.
चौथ्या दिवशी दुसऱ्या डावाची सुरुवात करणाऱ्या भारताला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का बसला. यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाला. असिथा फर्नांडोच्या चेंडूवर विकेटकीपरकडे झेल देऊन तो तंबूत परतला. पहिल्या डावातही जैस्वाल मोठी खेळी करू शकला नव्हता. भारताने वेगाने धावा करून श्रीलंकेला फलंदाजीसाठी बोलावण्याचा विचार केला होता, पण या विकेटमुळे सुरुवातीलाच योजनेला धक्का बसला. दुसऱ्या विकेटसाठी राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी ६५ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
Rishabh Pant walks back after a typically flamboyant half-century. 🚶➡️
Watch #SLvIND, 1st Test | Day 4, LIVE NOW on Sony Sports Network channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #BeautifulGameOfTestCricket pic.twitter.com/uBBiHTvsS8— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 18, 2026
प्रभात जयसूर्याला षटकार मारण्याच्या प्रयत्नात राहुल (३५) बाद झाला. त्यानंतर लगेचच कर्णधार शुभमन गिल (८) स्वीप शॉट खेळताना पायचीत झाला आणि भारताची अवस्था ३ बाद ८१ अशी झाली. ऋषभ पंत आणि पडिक्कल यांनी भारताला १०० धावांच्या पुढे नेलं, पण त्यानंतर केशान नुवांथाने पडिक्कलला (४४) पायचीत करून भारताला आणखी एक धक्का दिला. त्यानंतर आलेला ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत यांनी भारताला ११६ धावांपर्यंत पोहोचवलं. पण लंचनंतर ध्रुव जुरेल (७) बाद झाला. यानंतर रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांनी ५४ धावांची भागीदारी करून संघाला १७४ धावांपर्यंत नेलं.
Rishabh Pant walks back after a typically flamboyant half-century. 🚶➡️
Watch #SLvIND, 1st Test | Day 4, LIVE NOW on Sony Sports Network channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #BeautifulGameOfTestCricket pic.twitter.com/uBBiHTvsS8— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 18, 2026
श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजांनी शॉर्ट बॉलचा मारा करून भारतीय फलंदाजांना अडचणीत आणलं आणि त्यांची ही रणनीती यशस्वी ठरली. षटकार मारून अर्धशतक पूर्ण करणाऱ्या ऋषभ पंतला (६६) लाहिरू कुमाराने शॉर्ट बॉलवर बाद केलं. त्यानंतर रवींद्र जडेजा (९), मानव सुथार (९), कुलदीप यादव (५) आणि प्रसिद्ध कृष्णा हेसुद्धा शॉर्ट बॉलच्या जाळ्यात अडकले. भारताने शेवटचे ५ बळी फक्त १९ धावांत गमावले आणि संपूर्ण संघ १९३ धावांवर बाद झाला.