नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या पाठीवर हात का ठेवला, विधिमंडळ परिसरात आज काय घडलं?

Published : Jun 24, 2026, 06:07 PM IST
aaditya and nitesh

सार

महाराष्ट्र विधानमंडळ अधिवेशनादरम्यान राजकीय विरोधक असलेले आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांची भेट झाली. यावेळी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या पाठीवर थाप मारत "तुमच्या आणि माझ्यासाठीच ते थांबले आहेत!" असे म्हटले, ज्यानंतर हा संवाद आणि त्यांच्यातील हास्यविनोद चर्चेचा विषय ठरला आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या कामकाजाला वादळी सुरुवात झाली आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विधिमंडळ परिसरात सत्ताधारी आणि विरोधक यांची रोज गाठभेट होतो. अशा वेळी त्यांच्यात संवाद होत असतो. आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांची भेट झाली असून त्यांच्यातला संवाद चर्चेचा विषय ठरला आहे.

नितेश राणे काय म्हणाले? 

नितेश राणे आणि आदित्य ठाकरे या दोघांमध्ये संवाद झाला. यावेळी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना "तुमच्या आणि माझ्यासाठीच ते थांबले आहेत!" असं म्हटलं. त्यानंतर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या पाठीवर थाप मारली. एकमेकांकडे हसून बघत दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.

महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन टोक भेटली 

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्ये कायमच वाद होत असतात. त्यामध्ये आदित्य ठाकरे आणि नितेश राणे यांना दोन टोक समजलं जात. त्यांच्यात झालेला संवाद हा आता कौतुकाचा विषय ठरला आहे. दोन्ही नेत्यांच्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राणे यांना हसताना बघून कार्यकर्त्यांना संवादाला नवीन विषय मिळाला आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Metro Viral Video: आंघोळ करून थेट मेट्रोमध्ये! बाथरोब आणि टॉवेल गुंडाळून तरुणीचा प्रवास, प्रवासीही अवाक्
Viral Video : मुंबईत ८ महिने राहिल्यानंतर जपानी तरुणीने सांगितला अनुभव, व्हिडिओ व्हायरल