Virat Kohli Anushka Sharma : एकाच बिल्डिंगमध्ये विराट-अनुष्काचे 3 फ्लॅट्स, किंमत ऐकून थक्क व्हाल

Published : Oct 12, 2026, 11:08 PM IST
Virat Kohli Anushka Sharma : एकाच बिल्डिंगमध्ये विराट-अनुष्काचे 3 फ्लॅट्स, किंमत ऐकून थक्क व्हाल

सार

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुंबईत आणखी एक आलिशान घर खरेदी केलंय. या घराची किंमत ऐकून तुम्हीही नक्कीच थक्क व्हाल.

मुंबई : 'किंग' विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हे स्टार कपल कायमचं लंडनमध्ये स्थायिक होणार, असा अंदाज त्यांचे चाहते लावत होते. पण, त्यांची गुंतवणूक, रिअल इस्टेट आणि बिझनेस हे सगळं भारतातच आहे.

आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे, विराट आणि अनुष्काने मुंबईतील एकाच बिल्डिंगमध्ये तब्बल तीन आलिशान फ्लॅट्स खरेदी केले आहेत. यापैकी दोन फ्लॅट्स विराट-अनुष्काने घेतलेत, तर एक फ्लॅट अनुष्काच्या आई-वडिलांनी खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील पॉश अशा वर्सोवा भागात त्यांनी हे फ्लॅट्स घेतले आहेत. रिपोर्ट्सनुसार, या तिन्ही घरांची एकूण किंमत ४४.१ कोटी रुपये आहे. रिअल इस्टेट अ‍ॅनालिटिक्स फर्म 'सीआरई मॅट्रिक्स'ला मिळालेल्या नोंदणी कागदपत्रांनुसार, हे फ्लॅट्स वर्सोवाच्या यारी रोडवरील 'गोदरेज स्कायशोर' या बिल्डिंगमध्ये आहेत.

प्रॉपर्टीच्या कागदपत्रांनुसार - 

अनुष्का शर्माच्या नावावर असलेल्या घराचं क्षेत्रफळ २१५३ चौरस फूट असून त्याची किंमत १४.८९ कोटी रुपये आहे. या आलिशान घरासाठी तिने ७४.४७ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. याच बिल्डिंगमध्ये अनुष्काचे आई-वडील आशिमा आणि अजय कुमार शर्मा यांनी १०.९१ कोटी रुपयांचा फ्लॅट घेतलाय. त्यांनी यासाठी ६५.४४ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी दिली आहे. विशेष म्हणजे, या सर्वांनी गेल्या जुलै महिन्यातच घराचं रजिस्ट्रेशन पूर्ण केलंय.

विराटसोबत तिसरा फ्लॅट

काही रिपोर्ट्सनुसार, अनुष्काने विराट कोहलीसोबत मिळून तिसरा फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटची किंमत १८.२९ कोटी रुपये असून तो २६४४ चौरस फुटांचा आहे. हे तिन्ही फ्लॅट्स 'गोदरेज स्कायशोर'च्या टॉवर-ए मध्ये २४ व्या मजल्यावर आहेत. हा प्रोजेक्ट सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे. रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांनुसार, ३० जून २०३१ पर्यंत या घरांचा ताबा (पझेशन) त्यांना मिळेल.

गुंतवणुकीच्या बाबतीत 'विरुष्का' एकदम भारी

गुंतवणूक करण्याच्या बाबतीत विराट आणि अनुष्का नेहमीच पुढे असतात. त्यांनी प्रॉपर्टीत पैसे गुंतवण्याची ही काही पहिली वेळ नाही. देशातील अनेक भागांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. रिपोर्ट्सनुसार, २०२६ मध्ये याच फ्लॅटच्या शेजारी त्यांनी दोन फ्लॅट्स खरेदी केले आहेत. त्याची किंमत ३७ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. याशिवाय, अलिबागमध्येही या कपलची स्वतःची प्रॉपर्टी आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Greenery : परदेशी नागरिकाला मुंबईची भुरळ, शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांचं केलं कौतुक
Tukaram Mundhe : शाळेत वडापाव पुन्हा सुरू करा! चिमुकल्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं भन्नाट उत्तर