
वसई : आपल्याकडे रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षा काही नवीन नाहीत. पण वसईमध्ये एक अशी रिक्षा दिसली आहे, जिने रोजच्या प्रवासाला एक वेगळाच ट्विस्ट दिला आहे. या रिक्षाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यात रिक्षाला चक्क पारदर्शक छत (Transparent Roof) असल्याचं दिसतंय. त्यामुळे अनेक जण गंमतीने या रिक्षाची तुलना सनरूफ असलेल्या कारशी करत आहेत. या अनोख्या डिझाइनमुळे प्रवाशांना प्रवास करताना वरचं आकाश स्पष्ट दिसतं. त्यामुळे साध्या रिक्षाचा प्रवास जणू काही 'सनरूफ एक्सपीरियन्स' बनला आहे.
या व्हिडिओमध्ये काही प्रवासी या मॉडिफाइड रिक्षातून प्रवास करताना मजा घेत असल्याचं दिसतंय. एक तरुणी तर इतरांसोबत प्रवास करताना सेल्फी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. या रिक्षाचं अनोखं छतच या व्हिडिओचं मुख्य आकर्षण ठरलं आणि त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हा व्हिडिओ @the.co.usinscrew नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्यात वसई हे लोकेशन टॅग केलं आहे.
पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे: "साधा रिक्षा प्रवास ❌ रिक्षात सनरूफचा अनुभव."
व्हिडिओमध्ये प्रवासी हसताना आणि रिक्षातून फिरताना दिसत आहेत. या रिक्षाचं पारदर्शक काचेचं किंवा प्लास्टिकचं छत गाडीत प्रकाश येऊ देतं आणि प्रवाशांना आकाशाचा स्पष्ट व्ह्यू देतं.
याचमुळे सोशल मीडिया यूजर्स गंमतीने या रिक्षाला 'सनरूफ ऑटो' म्हणत आहेत. यामुळे एका सामान्य वाटणाऱ्या प्रवासाच्या साधनाला जणू काही लक्झरी टच मिळाला आहे.
व्हिडिओवर लिहिलेल्या 'प्लॉट ट्विस्ट: सनरूफ ऑटो' या टेक्स्टमुळे तो आणखी मजेशीर वाटतो.
बहुतेक रिक्षांच्या पारंपरिक छतांपेक्षा हे पारदर्शक छत रिक्षाला एक वेगळाच लुक देतं. प्रवासी या अनोख्या अनुभवाची मजा घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ हेही दाखवतो की, जेव्हा एखादी वेगळी गोष्ट लोकांच्या नजरेत येते, तेव्हा रोजच्या प्रवासाचे साधे क्षणही कसे खास ठरू शकतात, सोशल मीडियावर कसे व्हायरल होऊ शकतात.
या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तर या रिक्षाची तुलना महागड्या किंवा कन्व्हर्टिबल कारशी केली आहे.
एका युजरने कमेंट केली, “सनरूफवाली प्रीमियम ऑटो.” दुसऱ्या युजरने लिहिलं, “सेमी कन्व्हर्टिबल.” एका युजरची कमेंट होती, “कमी पैशात लक्झरी फिलिंग... रिक्षा मालकाचं कौतुक.” आणखी एका युरने म्हटलं, "मला यात बसायचंय."