
मुंबई - ऑटो चालवून कमाई करणं ही सामान्य गोष्ट आहे. पण एखादा ऑटोचालक स्वतः ऑटो चालवत नसताना महिन्याला ५ ते ८ लाख रुपये कमावत असेल, तर? होय, मुंबईतील एका ऑटोचालकाने हे करून दाखवलं आहे, तेही कुठलीही मोबाईल अॅप, स्टार्टअप फंडिंग किंवा तंत्रज्ञान न वापरता. त्याची कमाईचा मार्ग आहे, यूएस कॉन्सुलेटबाहेर बॅग ठेवण्याची सेवा!
समस्या बनली संधी
लेन्सकार्टचे प्रॉडक्ट लीडर राहूल रूपाणी यांनी ही गोष्ट लिंक्डइनवर शेअर केली आहे. त्यांनी लिहिलं, “माझ्या व्हिसा अपॉईंटमेंटच्या दिवशी सुरक्षा रक्षकांनी बॅग आत न्यायला मनाई केली. तिथं कुठलाही लॉकर नव्हता. एक ऑटोचालक पुढे आला आणि म्हणाला, ‘सर, बॅग दे दो. सेफ रखूंगा, मेरा रोज का है. ₹1,000 चार्ज है.’”
त्याच क्षणी, एका साध्या गरजेतून उत्कृष्ट व्यवसायाची कल्पना कशी साकारली जाऊ शकते, हे रूपाणींनी अनुभवले.
व्यवसाय कसा चालतो?
कायदेशीर आणि सुरक्षित पद्धत
बॅग ठेवल्या जातात त्या केवळ ऑटोमध्ये नाहीत. एक स्थानिक पोलीस अधिकारी जवळच लॉकरची सुविधा चालवतो, त्याच्याशी भागीदारी करून ऑटोचालक त्या ठिकाणी बॅगा ठेवतो. त्यामुळे हे कायदेशीर, सुरक्षित आणि त्रासमुक्त आहे.
तंत्रज्ञान नाही, तरी ट्रस्ट निर्माण
रूपाणी म्हणतात, “ही खरी उद्योजकता आहे, MBA नाही, स्टार्टअपची भाषा नाही, फक्त एक गरज ओळखून ती पूर्ण करणं.”
“कोणतीही गुंतवणूक नाही, ना कोडिंग, ना पिच डेक, फक्त एक पार्किंग स्पॉट आणि विश्वास,” असं त्यांनी म्हटलं.
शिकवण
हा ऑटोचालक म्हणजे एक ‘रोडसाइड स्टार्टअप स्टार’ आहे. रोजगार निर्माण करण्यासाठी IIT किंवा IIM ची गरज नाही, गरज आहे ती कल्पकतेची आणि कृतीची, हे या उदाहरणातून स्पष्ट होते.
तुम्ही पुढच्या वेळी यूएस व्हिसासाठी जात असाल आणि बॅगबाबत चिंता वाटत असेल, तर लक्षात ठेवा, पार्किंगमध्ये एक स्मार्ट ऑटोचालक तुमच्या सेवेत सज्ज असेल!