सुनेत्रा पवारांचा आज सायंकाळी 5 वाजता शपथविधी, शरद पवार गटाशी दूरावा कायम

Published : Jan 31, 2026, 08:12 AM IST
Sunetra Pawar will take oath at 5 pm on Saturday

सार

Sunetra Pawar will take oath at 5 pm on Saturday : बारामतीमध्ये बुधवारी झालेल्या अपघातात निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, शनिवारी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

Sunetra Pawar will take oath at 5 pm on Saturday : बारामतीमध्ये बुधवारी झालेल्या अपघातात निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, शनिवारी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. अजितदादांच्या निधनानंतर ३ दिवसांनी ही महत्त्वपूर्ण घडामोड होत आहे. दरम्यान, या सोहळ्यापासून शरद पवार गटाला दूर ठेवण्यात आले आहे. शरद पवारांशी कोणतीही चर्चा न करता सुनेत्रा पवार शपथ घेणार असल्याचे समजते.

शनिवारी दुपारी २ वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक

शनिवारी दुपारी २ वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक घेऊन त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होईल, असे सूत्रांनी सांगितले. असे झाल्यास त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील.

सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा खासदार असून, त्या महाराष्ट्र विधानसभेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्य नाहीत. अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघातून त्या आगामी पोटनिवडणुकीत लढण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या गटांचे विलीनीकरण?

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. याबाबत नुकतीच दोन्ही गटांच्या नेत्यांनी शरद पवारांसोबत चर्चा केली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर विलीनीकरणाची अधिकृत घोषणा अपेक्षित होती. पण त्याआधीच अजित पवारांचे निधन झाले. आता पुढील आठवड्यात याबाबत अंतिम चर्चेची शक्यता आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट