Sharad Pawar Health : शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; डिहायड्रेशनचा त्रास

Published : Nov 26, 2026, 02:33 PM IST
Sharad Pawar

सार

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना डिहायड्रेशनच्या त्रासामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डिहायड्रेशनमुळे त्यांना त्रास होत असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील दोन दिवस त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. दरम्यान, शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

डिहायड्रेशनचा त्रास, सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

शरद पवार यांना डिहायड्रेशनचा त्रास झाला असावा, असं सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरील स्टेटसमधून सांगितलं. त्यांनी आता कामाचा वेग कमी करावा आणि प्रवासही मर्यादित ठेवावा, अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. मात्र, बाबांना त्यांच्या कामावर खूप प्रेम असल्याने ते कोणाचंच ऐकत नाहीत, असंही त्यांनी म्हटलं. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

पुढील दोन दिवस रुग्णालयात उपचार सुरू राहणार

शरद पवार यांना डिहायड्रेशनच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. सुप्रिया सुळे या शरद पवार यांची भेट घेऊन पुन्हा बैठकीसाठी येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर आणि व्यवस्थित असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील दोन दिवस उपचार सुरू राहतील, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.

दिवाळीपूर्वीही प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

यापूर्वी 4 नोव्हेंबर रोजी शरद पवार दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असताना त्यांना कफ आणि अशक्तपणाचा त्रास जाणवला होता. त्यामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आणि त्यांना सोलापूरहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यावेळी व्हीलचेअरवरून बाहेर येताना त्यांनी कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केली होती विचारपूस

यापूर्वी शरद पवार रुग्णालयात दाखल असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच, त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहनही मोदी यांनी केलं होतं.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

26/11 च्या शहिदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गेटवे ऑफ इंडियावर आदरांजली
Mumbai 26/11 Attack : मुंबईवरील 26/11 हल्ल्याचे ६ मुख्य सूत्रधार पाकिस्तानात अजूनही मोकाट