दोन्ही पवार एकत्र येणार? राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांचे सुचक वक्तव्य, दोन मतप्रवाह केले मान्य

Published : May 08, 2025, 03:21 PM IST
Sharad Pawar

सार

शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या एकत्रीकरणावर सूचक वक्तव्य केल्याने चर्चांना नवा आयाम मिळाला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी अजित पवार गटाबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली आहे.

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल होण्याची चिन्हं दिसत असताना, शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या एकत्रीकरणावर सूचक वक्तव्य केल्याने चर्चांना नवा आयाम मिळाला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी अजित पवार गटाबाबत स्पष्टपणे भूमिका मांडली आहे.

दोन विचारसरणी, दोन गट

शरद पवार म्हणाले, “आमच्या पक्षात दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. एक मतप्रवाह सांगतो की दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र यायला हवं. तर दुसरा गट भाजपासोबत कोणत्याही प्रकारे जाण्याच्या विरोधात आहे.”

हे विधान केवळ पक्षातील अंतर्गत गटांवर प्रकाश टाकत नाही, तर राज्यातील आगामी राजकीय समीकरणांचाही इशारा देतं.

अजित पवारांचा गट कुठे?

अजित पवार यांचा गट सध्या राज्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपासोबत सत्तेत आहे. दुसरीकडे शरद पवारांचा गट महाविकास आघाडीचा घटक असून, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आघाडी करत आहे.

इंडिया आघाडीवर टीका आणि चिंता

इंडिया आघाडीबाबतही शरद पवारांनी “सध्या ही आघाडी शांत आहे” असे सांगून पुन्हा एकदा विरोधकांनी एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली. “आम्हाला पक्षाची पुनर्बांधणी करावी लागेल, तरुणांना सामावून घ्यावं लागेल, आणि त्यानंतर विरोधात एकत्र येऊन काम करावं लागेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपाला पर्याय उभा करण्याची गरज

शरद पवारांनी “आमचा विचार विरोधी पक्षात काम करण्याचा आहे. भारतीय जनता पक्षाला एक सक्षम पर्याय तयार करावा लागेल” असे सांगत स्वतःची स्पष्ट भूमिका मांडली.

सुप्रिया सुळेवर सूचक विधान

सुप्रिया सुळे यांच्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, “संसदेमध्ये विरोधी पक्षात बसायचं की नाही, याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील.”

या विधानामुळे सुप्रिया सुळे यांना पक्षात स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत असल्याचे संकेत मिळतात.

शरद पवारांच्या या विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. मात्र, त्याचबरोबर त्यांनी भाजपाविरोधी राजकीय पर्याय तयार करण्याचा संदेशही दिला आहे. येत्या काळात महाराष्ट्रातील राजकारणात नवे रंग चढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

PREV

Recommended Stories

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!