
मुंबई : एकीकडे उन्हामुळे वातावरण तापलंय, तरी दुसरीकडे देशातही वातावरण तापलंय व्होट चोरीमुळे असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली. पुढे भाषणात बोलताना ते म्हणाले, '२०१७, २०१८ पासून राज ठाकरे तुम्हाला सांगतोय की यात चोऱ्या सुरू आहेत. त्यावेळी मी सोनिया गांधी, ममता बॅनर्जी यांना भेटलो होतो. त्यावेळी अनेक नेत्यांना भेटलो. मी सतत सांगत होतो, ज्याप्रकारचं निवडणूक आयोग, मशीन, मतदान याद्या जो घोळ सुरू आहे यावर पाऊल उचललं पाहिजे. त्यावेळी सांगत होतो निवडणुकीवर बहिष्कार टाका. कारण त्याशिवाय दूध का दूध पानी का पानी होणार नाही.'
राज ठाकरेंनी सांगितल्या दोन महत्त्वाच्या मागण्या -
पुढे बोलताना राज ठाकरेंनी त्यांच्या दोन मागण्या मांडल्या. 'आज दोन विषय महत्त्वाचे मांडायचे आहेत. एक विषय म्हणजे महाराष्ट्रात आतापर्यंत जो एसआयआर झाला, तो संपूर्ण रद्द झाला पाहिजे. देशभरातील एसआयआरचं हे प्रकरण पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आणि दुसरं म्हणजे यापुढे या देशातील वोटिंग मशीन बंद होऊन बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे. या दोन गोष्टी झाल्या तर दूध का दूध पाणी का पाणी होईल. यानंतर उद्या कोणाचीही सत्ता येऊदे काही फरक पडत नाही, पण ती योग्य मार्गाने यावी. हीच विनंती करण्यासाठी आज आलो.'
‘विधानसभेची निवडणूक २०२४ ची त्यात संपूर्ण बहूमत राज्यात भाजपला मिळालं. महाराष्ट्रात जल्लोष नाही. असा कोणता विजय असतो, जिथे विजय मिळाल्यानंतरही लोकांमध्ये उत्साह नाही, जल्लोष नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक या ६ महिन्यांच्या काळात ४० ते ६० लाख मतदार वाढवले गेले. मतदार वाढतात कसे अचानक? लोकसभा निवडणुकीत भाजपला २ कोटी ४४ लाख २७ हजार मतं मिळाली, नंतर विधानसभेत ६ महिन्यानंतर भाजपला ३ कोटी १६ लाख १६ हजार मतं पडली. इतकी मतं कशी वाढली? आता सगळं उघड झाली आहे.’
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, महाराष्ट्रातील माता, बंधू-भगिनींना , तरुण-तरुणींना आग्रहाची विनंती,
उद्या ४ ऑक्टोबर २०२६ रोजी, भ्रष्ट निवडणूक आयोगाच्या विरोधात, एसआयआरविरोधात (SIR) महाराष्ट्रातील जनतेचा, 'गर्जना' मोर्चा आहे याची तुम्हाला माहिती आहेच. माझी सर्वांना विनंती आहे की या मोर्च्याला जरूर या. या देशातील लोकशाही आणि देशाचं संविधान वाचवायचं असेल तर या मोर्च्याला नक्की या.
राज ठाकरे ।
An earnest appeal to all my ‘Maharashtra Sainiks’, as well as the mothers, brothers, sisters, and the youth of Maharashtra:
You are well aware that tomorrow, October 4, 2026, a ‘Garjana’ (Roar) protest march organized by the people of Maharashtra is taking place against the corrupt Election Commission and the SIR. I urge everyone to attend this march. If we wish to save the democracy and the Constitution of this country, it is essential that you participate in this march.
Raj Thackeray
— Raj Thackeray (@RajThackeray) October 3, 2026
'सत्ताधारी पक्षाला इतकंच सांगायचं आहे, की आम्हाला कोणता राग नाही, की तुम्ही सत्तेत बसलाय, पण तुम्ही सत्ता कशाप्रकारे राबवताय याचा राग आहे. या देशातील मतदारांनी ठरवावं कोणाला सत्तेत बसवावं, निवडणूक आयोगाने नाही. मनमानी कारभार सुरू आहे. एकाच उद्योगपतीला जंगलं, जमिनी, विमानतळं देऊन टाकायची. काहीही केलं तर फरक पडत नाही. आम्ही मनात येऊ ते करू, हे येतं कुठून? हे निवडणूक आयोगाला बांधल्याशिवाय येत नाहीये. जनतेने कितीही मोर्चे काढवीत, आंदोलनं करावीत पण निवडणूक आयोग आमच्याबरोबर असेल, तर आम्ही कसेही निवडणून येऊ. आम्ही वागायचं तसं वागू. देशाची आर्थिक स्थिती बर्बाद करायचं ते करू, अन्नधान्य, पेट्रोलचे भाव वाढवू.'
‘कोणताही राजकीय पक्षा जेव्हा सत्तेत असतो, तेव्हा त्याला एक भीती असते, उद्या एखादं पाऊल उचललं आणि सत्ता गेली अशी भीती असते. पण अशी कोणतीही भीती सरकारला नाही. महाराष्ट्रातही नाही, केंद्रातही अशी भीती दिसत नाही. दिसली जमीन देऊन टाका अदानीला. उद्योगपतींना विरोध नाही. उद्योगपती या देशाला हवेत. काँग्रेसच्या काळातही अनेक उद्योगपती उभे राहिले, पण ते अनेक उद्योगपती उभे राहिले. यांच्या काळात फक्त एकच उद्योगपती मोठा होताना दिसतोय. ही हिम्मत आली कुठून. कारण सगळी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आम्ही ताब्यात घेतली आहेत. सगळे चॅनेल, निवडणूक आयोग ताब्यात घेतलंय. त्यामुळे खऱ्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या नाहीत.’
'सत्तेतल्या कोणत्याही पक्षाने विचार करायला हवा, की आपण चुकीचे उचललं पाऊल, चुकीचं धोरण भविष्यातील चुकीचा पायंडा पाडणार का? सत्ता ज्यावेळी येते, त्याच क्षणाला सत्ता जायला सुरू होते. फक्त तुम्ही किती काळ ती पुढे ढकलता एवढाच विषय असतो. आज भाजप सत्तेवर आहे, उद्या सत्तेवर नसेल. उद्या दुसरा पक्ष सत्तेवर नसेल, तो ज्यावेळी अशाचप्रकारे सत्ता राबवायची ठरवली तर तुम्ही काय कराल? तुम्ही मोर्चे काढाल, आंदोलन काढली, तरी ऐकणार नाही, यापुढच्या सत्तेतील पक्षाने यापेक्षा जास्त केलं तर तुम्ही काय कराल? कुठे जाल? या देशाचा ढाचा बदलतोय. सत्तेत यायचं आणि कसाही लोकांवर वरवंटा फिरवायचा कसं होईल? आजचा मोर्चा याविरोधातील आहे.'
'सत्तेतील लोकांनीही विचार करा, ज्यादिवशी तुम्ही विरोधी पक्षात जाल, दुसरे सत्तेत येतील आणि आता तुम्ही करत असलेली गोष्ट त्यांनी दुपटीने केली तर त्यावेळी तुम्ही काय कराल? लोकांना अंधारात ठेवायचं, लोक मतदान करत नाहीयेत, बोगस मतदान वाढवायचं, वाटेल तशा मतदान याद्या करायच्या हे किती काळ चालणार?' असा सवाल करत राज ठाकरेनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.