Pradip Purnekar | पप्या शिंदेची आई बोलली, पण अडचण मिनाक्षी शिंदे यांची वाढली

Jaywant Patil   | CMS
Published : Oct 01, 2026, 07:42 PM IST
purnekar thane case

सार

ठाण्यातील प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेच्या आईने खरा सुत्रधार माझा मुलगा नसून कोण आहे याची माहिती दिली आहे. यामुळे माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

ठाणे : उबाठाचे प्रदीप पुर्णेकर यांची ठाण्यात त्यांच्या कार्यालयात हत्या करण्यात आली. या हत्येनंतर ठाण्यात जनसामान्यांमध्ये आक्रोश दिसून आला. पप्या शिंदे हा प्रदीप पुर्णेकर यांचा मित्र होता, एका ताटात जेवणारे हे मित्र होते, असं प्रदीप पुर्णेकर यांच्या पत्नीने म्हटलंय, तसेच पप्या शिंदे याने हा घात का केला, असा आरोपही प्रदीप पुर्णेकर यांच्या पत्नीने केल्यानंतर पप्या शिंदे यावर सर्वांची संशयाची सुई आहे. प्रदीप पुर्णेकर यांची हत्या झाली तेव्हा पप्या शिंदे याच्यावर एकही वार कसा झाला नाही. तो तर पुर्णेकर यांच्या बाजूला बसला होता, असा संशय आणि आरोप प्रदीप पुर्णेकर यांचा मुलगा राम पुर्णेकर यांने केला आहे.

यात पप्या शिंदे हाच खरा या प्रकरणातला सुत्रधार असल्याचं समोर येत आहे. याप्रकरणी पप्या शिंदे याला पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. पण पप्या शिंदे हा रडतोय, तो म्हणतोय प्रदीप पुर्णेकर म्हणजे बाळूदादा याला मी मारलेलं नाही. त्याची हत्या होणार होती याची आपल्याला कोणतीही कल्पना आरोपींनी दिलेली नाही, मी आरोपींच्या गाडीने आलो हे खरं आहे. पप्या शिंदे याने ही प्रतिक्रिया त्याच्या आईजवळ व्यक्त केलेली आहे.

पप्या शिंदे याच्या आईने खरा सुत्रधार कोण आहे हे देखील सांगितलेले आहे, अर्थात तिचा हा संशय आहे. माझा मुलगा पप्या शिंदे याला मी कोर्टात भेटले, तो रडत होता, तो म्हणत होता मी बाळूदादाचा खून केलेला नाही. तर माझा मुलगा पप्पू याच्याजवळ टल्ली म्हणजेच तो कनोजिया अनेक दिवसांपासून सारख्या फेऱ्या मारत होता.

तेव्हा माझ्या लहान मुलाने देखील पप्पूला सांगितले होते, याच्यासोबत जास्त राहू नको, तर तो टल्ली का कोणतरी आहे, कनोजिया हा खरा सु्त्रधार आहे आणि तो मिनाक्षी शिंदे यांच्या जवळचा असल्याचंही पप्पू शिंदे याच्या आईने ही माहिती दिली आहे. तसेच प्रदीप पुर्णेकर याचे बंधू जयनाथ यांना देखील मी भेटणार आहे, मी आजच जाणार होतो, पण मला मुलाने जाऊ दिले नाही, थोडावेळ जाऊ दे असं सांगितलं.

एकंदरीत पप्या शिंदे याच्या आईने दिलेली माहिती या प्रकरणात निश्चितच महत्त्वाची ठरणार आहे. कारण पप्या शिंदे यांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरी सतत संपर्कात येणारा टल्ली उर्फ कनोजिया हा माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचा जवळचा आहे. ही साक्ष झाली तर या प्रकरणात मिनाक्षी शिंदे यांच्यासमोरील अडचणीत आणखी वाढ होणार आहे. एकंदरीत ठाण्याचे प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण महाराष्ट्राचं राजकारण हादरवणारं ठरणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Antique Gold Earrings : साडीवर शोभून दिसणारे भन्नाट अँटिक गोल्ड इअररिंग्स
Anant Ambani : 9 कोटींच्या उपचारासाठी अनंत अंबानींची मदत, लालबागच्या राजाजवळ थांबवली गाडी