Csmt Station Update: मुंबईकरांसाठी रेल्वेची मोठी बातमी, ३ महिने 'हा' प्लॅटफॉर्म राहणार बंद

Published : Sep 27, 2025, 11:20 AM IST
csmt railway

सार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वर पायाभूत कामांमुळे तो तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात अमरावती-सीएसएमटी आणि बल्लारशाह-सीएसएमटी या दोन एक्स्प्रेस गाड्या दादरपर्यंतच चालवल्या जातील. 

मुंबई: मुंबईकरांसाठी रेल्वेची एक महत्वाची बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ऐतिहासिक टर्मिनसच्या १८ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर पायाभूत काम केली जाणार आहेत. त्याच ठिकाणी सुरक्षा बॅरिकेट्स उभारण्याचे काम सुरु केले जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबतची माहिती दिली आहे.

३ महिने प्लॅटफॉर्म राहणार बंद 

३ महिने येथील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या काळात १८ नंबर प्लॅटफॉर्मवरून सुटणाऱ्या अमरावती - सीएसएमटी आणि बल्लारशाह सीएसएमटी या दोन्ही एक्स्प्रेस गाड्या दादरपर्यंत चालणार आहेत. या काळात प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या वतीने आधी माहिती देण्यात आली आहे.

खर्च किती रुपये होणार? 

या प्रकल्पासाठी खर्च मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार असून २४५० कोटी रुपये खर्च निर्धारित केला जाणार आहे. या प्रकल्पाचा उद्देश सीएसएमटीच्या सर्व प्लॅटफॉर्मवर विस्तारित डेक बांधणे आणि प्रवाशांच्या सुविधा वाढवणे हा आहे. टप्प्याटप्प्याने सर्व प्लॅटफॉर्मवर पायलिंगचे काम सुरू आहे आणि त्यासाठी सध्या 18 नंबर प्लॅटफॉर्म बंद ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

दररोज या प्लॅटफॉर्मवर किती गाड्या जातात? 

दररोज सीएसएमटी या दररोज ११ ते १८ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर २० ते २२ दररोज गाड्या वाहत असतात. त्यामुळे या गाड्या पकडण्यासाठी दररोज लाखो प्रवासी १८ नंबर फलाटाचा वापर करत असतात. या काळात तीन महिने हा फलाट बंद ठेवल्यास प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय निर्माण होऊ शकते. प्लॅटफॉर्म 12 आणि 13 यांच्याबाबतही रेल्वेने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

नव्या डेकवर नवीन सुविधा उपलब्ध होणार

नव्या डेकवर नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या डेकवर तिकीट काउंटर, प्रवाशांसाठी प्रतीक्षा क्षेत्र, वाद्यपदार्थाचे स्टॉल तसेच वरच्या मजल्यावर खरेदी आणि मनोरंजन केंद्रांच्या सुविधा असतील. यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुलभ आणि आरामदायक होणार आहे. तसेच सीएसएमटी प्रकल्प शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ
माझो वरली महागडी गं, रिअल इस्टेटमध्ये न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनशी होतेय तुलना, अपार्टमेंटची किंमत 1 लाख रुपये प्रति चौरस फूट