
मुंबई : मुंबईच्या टिळक नगरमधील एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये अचानक भयंकर दुर्गंधी येऊ लागली. यानंतर रहिवाशांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका फूड डिलिव्हरी बॉयचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला. चेंबूरच्या अक्षय को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सोमवारी ही घटना घडली. दुपारी अडीचच्या सुमारास एका सदस्याने सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर लिफ्टमध्ये खूप घाण वास येत असल्याचं सांगितलं. सुरुवातीला एखाद्या कुत्र्याने किंवा पाळीव प्राण्याने लिफ्टमध्ये घाण केली असावी, असा संशय रहिवासी आणि हाऊसकीपिंग स्टाफला आला. नेमकं काय घडलंय हे पाहण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचा निर्णय घेतला.
Shock in Chembur as a delivery rider was allegedly caught on CCTV urinating inside a society lift and drinking it; even police were reportedly unsure which section to apply.
#Mumbai #Chembur #Shocking #CCTV #BreakingNews pic.twitter.com/wDPUkEsqd6— Chetna Raja (@ChetnaRaja) October 1, 2026
Mumbai: A delivery boy at a society in Chembur allegedly used to urinate into his hand and drink it inside d lift before delivering food parcels. Aftr CCTV footage of d incident went viral, local police have launched a search for the delivery boy.@NBTMumbai@NavbharatTimes pic.twitter.com/ubMfWawueu
— Manish Jha (@nbtmanish) October 1, 2026
'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, सोसायटीचे सदस्य गिरीश यांनी सांगितलं की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक फूड डिलिव्हरी बॉय लिफ्टमध्ये शिरताना आणि तिथेच लघवी करताना दिसला. धक्कादायक म्हणजे, या व्यक्तीने हातावर लघवी करून ती स्वतःच प्यायल्याचा आरोपही रहिवाशांनी केला आहे. हे फुटेज पाहून सोसायटीतील लोक चांगलेच संतापले आहेत.
सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर सोसायटीने तातडीने लिफ्ट स्वच्छ करून घेतली. तसेच, सोसायटीच्या व्यवस्थापनाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत झोमॅटो (Zomato) आणि स्थानिक प्रशासनाला टॅग केलं.
रहिवाशांनी झोमॅटोच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला. तेव्हा कंपनीने या डिलिव्हरी बॉयला कामावरून काढून टाकल्याचं सांगितलं. पण, डिलिव्हरी बॉय सोसायटीच्या सामायिक जागांचा कसा वापर करतात, यावर अधिक कडक नियम असायला हवेत, असं सोसायटीच्या सदस्यांचं म्हणणं आहे.
सोसायटीच्या रेकॉर्डमध्ये असलेल्या मोबाईल नंबरवर रहिवाशांनी या डिलिव्हरी बॉयशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तो नंबर चुकीचा असल्याचं समोर आलं. यानंतर सोसायटीने पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला.
तक्रार दाखल करण्यासाठी सोसायटीच्या सदस्यांचं एक शिष्टमंडळ पोलीस ठाण्यात पोहोचलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि आरोप सिद्ध झाल्यास कडक कारवाई केली जावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
या घटनेमुळे फूड डिलिव्हरीसाठी निवासी इमारतींमध्ये येणाऱ्या कामगारांच्या व्हेरिफिकेशन आणि जबाबदारीवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्राहकांना पार्सल देण्यासाठी डिलिव्हरी बॉयना लिफ्टसह सोसायटीच्या इतर सामायिक जागांवर जाण्याची परवानगी दिली जाते, असं रहिवाशांनी सांगितलं.
अशा जागांवर जर असं गैरवर्तन होत असेल, तर त्यामुळे सोसायटीतील स्वच्छता आणि सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे.