Mumbai Water Cut: मुंबईकरांनो लक्ष द्या! ऐन उन्हाळ्यात 'या' भागात पाणीबाणी; सलग २४ तास नळ राहणार कोरडे

Published : Mar 10, 2026, 04:29 PM IST
water pipe

सार

Mumbai Water Cut: गोरेगाव (पूर्व) येथील जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे १० मार्चपासून पुढील २४ तास अनेक परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित होणार आहे. पालिकेने पाणी कपात होणाऱ्या भागांची यादी जाहीर केली आहे.

मुंबई: मुंबईत उन्हाचा कडाका वाढू लागला असतानाच, गोरेगाव परिसरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि काहीशी चिंतेची बातमी आहे. गोरेगाव (पूर्व) भागातील जलवाहिनीच्या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे पुढील २४ तास अनेक परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आणि साठवून ठेवण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

नेमकं कारण काय?

गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्म सिटी) मार्गावरील उड्डाणपुलाच्या कामासाठी ७५० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीच्या जोडणीचे (Connection) काम हाती घेण्यात आले आहे. हे काम तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.

पाणी कपातीची वेळ

सुरुवात: मंगळवार, १० मार्च - सकाळी ९:०० वाजल्यापासून.

समाप्ती: बुधवार, ११ मार्च - सकाळी ९:०० वाजेपर्यंत.

या भागात पाणी पूर्णपणे बंद राहणार ('P/East' आणि 'P/South')

खालील परिसरात मंगळवारी सकाळी ९ ते बुधवारी सकाळी ९ या काळात थेंबभरही पाणी येणार नाही.

फिल्म सिटी मार्गालगतचा संपूर्ण परिसर

शिवशाही प्रकल्प आणि श्रीकृष्ण नगर

इंदिरा गांधी संशोधन संस्था (IGIDR)

संतोष नगर, हबळे पाडा, माळी नगर

नगरमोडे पाडा, उमरशेट पाडा आणि सुनील मैदान

सॅटेलाईट टॉवर परिसर

येथे पाणी येईल, पण कमी दाबाने!

दुरुस्तीच्या कामामुळे काही भागांत पाणीपुरवठा सुरू असला तरी त्याचा प्रेशर (दाब) अत्यंत कमी असेल

मोहन गोखले मार्ग

कृष्णा वाटिका मार्ग

साई मार्ग आणि आर्य भास्कर मार्ग

महापालिकेचे आवाहन

दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरही सुरुवातीला काही काळ गढूळ किंवा कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी आजच पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करावे.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai LPG Shortage : मुंबईत एलपीजी सिलेंडर टंचाईचा फटका; पुढील 48 तासांत हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Mumbai Local : गर्दीत सीट मिळवण्यासाठी महिलेचा 'देसी जुगाड', व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल 'क्या बात है!'