मुंबईत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे रमेश केरे पाटील यांना शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी परवानगी न घेता आंदोलन केल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.

Maratha Reservation: मराठा ठोक मोर्चाचे आंदोलक रमेश केरे पाटील यांची गाडी गिरगाव चौपाटी येथे अडवली. मंगळवारी ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार होते, मराठा आरक्षणाबाब त्यांच्या भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होते. याआधी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोनल केले होते.

तर मंगळवारी देखील ते शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाणार होते, मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या रमेश केरे पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोणतीही परवानगी न घेता त्यांनी आंदोलन करत आहेत. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

आणखी वाचा :

अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, उत्तर दाखल करण्यासाठी वाढवला वेळ

 

Share this article