Ganeshotsav 2026 : मुंबईत पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त, गणेशोत्सवासाठी शहर सज्ज

Published : Sep 13, 2026, 10:27 PM IST
Ganeshotsav 2026 : मुंबईत पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त, गणेशोत्सवासाठी शहर सज्ज

सार

गणेशोत्सव २०२६ साठी मुंबई पोलीस पूर्णपणे सज्ज झाले आहेत. शहरात १४,००० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, ज्यात SRPF आणि QRT पथकांचाही समावेश आहे. विसर्जनासाठी विशेष नियोजन करण्यात आलंय. दरम्यान, प्रसिद्ध लालबागच्या राजाचं पहिलं दर्शनही झालं आहे.

मुंबई : मुंबई पोलिसांनी रविवारपासून गणेशोत्सव २०२६ साठी शहरात मोठा आणि अनेक स्तरांवरचा सुरक्षा बंदोबस्त लावला आहे. सण शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावा हा यामागचा उद्देश आहे. मुंबई पोलिसांनी या काळात सुरक्षेसाठी तब्बल ७ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ३७ पोलीस उपायुक्त, ५२ सहायक पोलीस आयुक्त, २६५० अधिकारी आणि १४१५० पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत.

याशिवाय, महत्त्वाच्या ठिकाणी SRPF च्या तुकड्या, क्विक रिस्पॉन्स टीम्स (QRT), दंगल नियंत्रण पथकं आणि होमगार्ड्सचाही पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेश मूर्ती विसर्जनाच्या दिवसासाठी स्वतंत्रपणे विशेष नियोजन करण्यात आलं असून, त्यासाठी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी संयम बाळगावा आणि पोलिसांना सहकार्य करावं, असं आवाहन एका अधिकृत निवेदनात करण्यात आलं आहे. कोणतीही बेवारस किंवा संशयास्पद वस्तू आढळल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. तातडीच्या मदतीसाठी नागरिक १०० किंवा ११२ या पोलीस हेल्पलाइनवर संपर्क साधू शकतात.

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन झालं

याआधी शुक्रवारी, गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या मूर्तीचं पहिलं दर्शन झालं. मुंबईच्या या वार्षिक उत्सवातील सर्वात प्रतिष्ठित गणेश मूर्ती आणि मुख्य आकर्षणांपैकी एक असलेल्या या राजाकडे सर्वांचं लक्ष लागून असतं. लालबागचा राजा ही केवळ एक मूर्ती नाही, तर ती सामूहिक श्रद्धा, कलात्मकता आणि मुंबईच्या उत्साही वृत्तीचं प्रतीक आहे.

दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी मंडपात गर्दी करतात, त्यामुळे या गणेश मूर्तीचं अनावरण हा उत्सवातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एक असतो. लालबागच्या राजाची भव्य मूर्ती सिंहासनावर विराजमान असून, तिचं रूप शांत, दयाळू आणि प्रेमळ आहे. मुंबईच्या गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन हा दरवर्षी सर्वांसाठी उत्सुकतेचा क्षण असतो.

उत्सवाबद्दल थोडक्यात

गणेश चतुर्थी हा १० दिवसांचा हिंदू सण आहे, जो गणपतीच्या जन्मानिमित्त साजरा केला जातो. या काळात घराघरात आणि सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या मूर्तींची स्थापना केली जाते, पूजा-अर्चा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मूर्ती विसर्जनाने या उत्सवाची सांगता होते. यावर्षी गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Navi Mumbai Airport : नवी मुंबई एअरपोर्टवरून मुंबई, पुण्यासाठी स्वस्त प्रवास; बस, टॅक्सी सेवा सुरू
Mumbai Road Rage : मुंबईत राँग साईडने येऊन महिलेला शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल