मुंबईत नीटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक करून पळून गेलेल्या क्लास मालकाला अटक, कर्नाटकात सापडला

NEET Paper Leak Case : साकीनाका येथे नीट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलं होतं. मात्र अवघ्या एका महिन्यातच ते केंद्र बंद करुन क्लासच्या मालकानं पोबारा केला होता. तो अखेर सापडला.

 

Rameshwar Gavhane | Published : Jun 29, 2024 6:04 AM IST / Updated: Jun 29 2024, 11:35 AM IST

NEET Exam Paper Leak Case : मुंबई : साकीनाका येथे नीट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र सुरू करून एक महिन्यात बंद करून फरार झालेल्या मालकाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आदित्य देशमुखचा अखेर शोध लागला आहे. त्याचं खरं नाव औरगंडा अरविंद कुमार असून तो मूळचा हैदराबादचा राहणारा आहे. त्याला सध्या कर्नाटक पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

साकीनाका येथे नीट विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलं होतं. मात्र अवघ्या एका महिन्यातच ते केंद्र बंद करुन क्लासच्या मालकानं पोबारा केला होता. अखेर त्या क्लास मालकाचा पोलिसांना शोध लागला आहे. त्याचं खरं नाव औरंगडा अरविंद कुमार आहे. तो मूळचा हैदराबादचा राहणारा आहे. त्याला सध्या कर्नाटक पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

बेळगावच्या मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अरविंद कुमारने एक नीट प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. तिथे एमबीबीएसमध्ये अॅडमिशन देण्याच्या बहाण्याने त्याने अनेकांची फसवणूक केल्याची धक्कादायक गोष्टही समोर आली आहे. यामध्ये त्याने एक कोटींपर्यंतची रक्कम लुटली होती. या प्रकरणात दाखल गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची फसवणूक करणारा हा सराईत गुन्हेगार असून या अगोदर त्याच्यावर हैदराबादेत 15 तर, बंगळुरूमध्ये एक गुन्हा दाखल आहे. मुंबईत देखील तो अशा प्रकारे विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक करण्याच्या तयारीत होता अशी माहिती मिळत आहे.

नेमके घडलंय काय?

मुंबईतील साकीनाका इथल्या वन एरोसिटी इथे नीट परीक्षेचं मार्गदर्शन करणाऱ्या कंपनीचा मालक अचानक पळून गेल्यानं संशय निर्माण झाला आहे. अद्वया विद्या प्रवेश मार्गदर्शक प्रा.लि असं या कंपनीचं नाव आहे. अरविंद देशमुख असं कर्मचाऱ्याचं नाव आहे. मात्र काल अचानकही कंपनी बंद करुन मालक फरार झाला आहे. एकीकडे नीट परीक्षेबाबत मोठा घोटाळा समोर येत असताना या कंपनीच्या मालक फरार झाल्याने संशय निर्माण होत आहे. इथल्या कर्मचाऱ्यांना महिन्याचा पगार मिळालेला नाही. त्यात कोणतंही कारण न देता ही कंपनी बंद केल्यानं कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत, तसेच चौकशीची मागणीही करत आहेत.

आणखी वाचा : 

Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर 2 कारचा भीषण अपघातात चक्काचूर, 6 जणांचा जागीच मृत्यू

Share this article