Mumbai Monorail: मुंबईकरांची प्रतीक्षा संपली! नव्या ढंगात पुन्हा धावणार 'मोनोरेल'; अधिक सुरक्षित आणि हायटेक सुविधांसह MMRDA सज्ज

Published : Feb 21, 2026, 10:13 PM IST

Mumbai Monorail: तांत्रिक कारणांमुळे बंद असलेली मुंबई मोनोरेल सेवा लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. MMRDA ने घोषित केल्यानुसार, ही नवीन मोनोरेल CBTC सिग्नलिंग, आधुनिक अंतर्गत सजावट आणि प्रवासी सुविधांसह अधिक सुरक्षित आणि वेगवान असेल. 

PREV
15
मुंबईकरांची प्रतीक्षा संपली! नव्या ढंगात पुन्हा धावणार 'मोनोरेल'

मुंबई : मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीचा महत्त्वाचा भाग असलेली मोनोरेल पुन्हा एकदा ट्रॅकवर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. तांत्रिक कारणास्तव दीर्घकाळ बंद असलेली ही सेवा आता अधिक 'स्मार्ट' आणि 'वेगवान' रूपात प्रवाशांच्या भेटीला येणार आहे. MMRDA ने नुकतीच 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वरून याबद्दल अधिकृत घोषणा केली असून, सुरक्षेच्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले आहे. 

25
सेवा का बंद करण्यात आली होती?

२० सप्टेंबर २०२५ रोजी तांत्रिक बिघाड आणि पावसाळ्यातील वारंवार होणाऱ्या खंडामुळे एमएमआरडीएने मोनोरेल सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित केली होती. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला होता, ज्यामुळे सुरक्षिततेचा विचार करून हा कठोर निर्णय घेण्यात आला होता.

35
नव्या मोनोमध्ये काय आहे खास? (२१ मोठ्या सुधारणा)

आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणारी मोनोरेल जुन्या मोनोपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि आधुनिक असेल. यात करण्यात आलेले मुख्य बदल खालीलप्रमाणे आहेत.

प्रगत सिग्नलिंग: नवीन 'CBTC' आधारित सिग्नलिंग प्रणालीमुळे रेल्वेचा वेग आणि सुरक्षितता वाढेल.

आधुनिक अंतर्गत सजावट: मेट्रोच्या धर्तीवर आतील रचना, सीसीटीव्ही कॅमेरे आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग सिस्टिम.

प्रवासी सुविधा: मोबाईल-लॅपटॉप चार्जिंग पॉईंट्स, डायनॅमिक रूट मॅप आणि दिव्यांगांसाठी विशेष आसनव्यवस्था.

स्मूथ राईड: प्रवासातील झटके कमी करण्यासाठी सुधारित सस्पेन्शन आणि अग्निसुरक्षेचे कडक निकष. 

45
सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त; आता फक्त 'या' मंजुरीची प्रतीक्षा

स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन संस्था 'ब्युरो व्हेरिटास' कडून मोनोरेलला आवश्यक सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. आता १९.५४ किमी लांबीच्या संपूर्ण कॉरिडॉरची अंतिम तपासणी करण्यासाठी सेवानिवृत्त मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांची हिरवी झेंडी मिळताच चेंबूर ते जेकब सर्कल दरम्यान पुन्हा एकदा मोनोचा प्रवास सुरू होईल. 

55
MMRDA चा विश्वास

नवी मोनोरेल केवळ प्रवाशांचा वेळ वाचवणार नाही, तर सुरक्षिततेच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करेल.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories