मुंबईतील प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! आता WhatsApp वरूनच काढता येणार मेट्रोचा पास

Published : Aug 17, 2026, 01:14 PM ISTUpdated : Aug 17, 2026, 01:15 PM IST
WhatsApp

सार

मुंबई मेट्रो वनने प्रवाशांसाठी डिजिटल मेट्रो पासची सुविधा सुरू केली आहे. यामुळे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऑनलाइन पद्धतीने पास काढता येणार आहे.

मुंबई : आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सअ‍ॅपचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जात आहे. याच्या माध्यमातून युपीआय पेमेंटपासून ते विविध डिजिटल सेवांपर्यंत अनेक सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध आहेत. अशातच आता मुंबई मेट्रोच्या प्रवाशांसाठीही व्हॉट्सअ‍ॅप बस्ड एक सुविधा सुरू करण्यात आली आहे.

देशातील पहिली व्हॉट्सअ‍ॅप आधारित मेट्रो पास सेवा

मुंबई मेट्रो वनने वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर कॉरिडॉरवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पूर्णपणे डिजिटल मेट्रो पास सिस्टम सुरू केली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना मेट्रो पास काढण्यासाठी वेगळा काउंटर किंवा अन्य प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची गरज भासणार नाहीये. पास थेट व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून काढता येणार आहे.यामुळे प्रवाशांचा रांगेत उभे राहण्याचा वेळ वाचणार आहे.

गुगल वॉलेट आणि अ‍ॅप्पल वॉलेटमध्येही पास सेव्ह करू शकता

व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने काढलेला डिजिटल मेट्रोचा पास प्रवाशांना गुगल वॉलेट आणि अ‍ॅप्पल वॉलेट मध्येही सेव्ह करता येणार आहे. यामुळे प्रवासाच्या वेळी पास सहजपणे अ‍ॅक्सेस करणे सोपे होणार आहे. डिजिटल स्वरूपातील ही सुविधा मेट्रोचा प्रवास अधिक सोपा आणि सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

डिजिटल सार्वजनिक वाहतुकीच्या दिशेने पाऊल

मुंबई मेट्रो वनच्या या उपक्रमामुळे शहरी वाहतूक व्यवस्थेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणखी वाढण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासोबतच सार्वजनिक वाहतुकीचा अनुभव डिजिटल आणि सुलभ करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवरून असा काढा मुंबई मेट्रो पास

मुंबई मेट्रो वनचा डिजिटल पास व्हॉट्सअ‍ॅपवरून काढण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

  • सर्वप्रथम अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक +91 9670008889 आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह करा.
  • आता व्हॉट्सअ‍ॅपवर सेव्ह केलेला नंबर सर्च करा आणि ‘Hi’ असा मेसेज पाठवा.
  • चॅटमध्ये दिलेल्या पर्यायांमधून ‘Book Now’ हा पर्याय निवडा.
  • ‘Digital Pass’ या पर्यायावर क्लिक करा. येथे Trip Pass किंवा Store Value Pass यापैकी कोणताही पर्याय निवडता येईल.
  • पुढे UPI, Debit Card किंवा Credit Car यापैकी कोणत्याही माध्यमातून पेमेंट करा.
  • पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमचा डिजिटल मेट्रो पास व्हॉट्सव्हॉट्सअ‍ॅपवर तुम्हाला उपलब्ध होईल.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai BEST Bus Fire: सायनच्या अणिक डेपोत भीषण आग, १० BEST बसेस जळून खाक; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Navi Mumbai Airport : नवी मुंबई एअरपोर्टवरून मुंबई, पुण्यासाठी स्वस्त प्रवास; बस, टॅक्सी सेवा सुरू