Central Railway : ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Published : Jul 24, 2024, 12:04 PM IST
Mumbai Local news

सार

Central Railway Update : मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बुधवारी मनस्तापाला सामोर जावे लागत आहे. सकाळी ऐन कामावर जायच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.  

Central Railway Update : बुधवारी पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर वरती बांबू पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. माटुंगा स्टेशनच्याजवळ कन्ट्रक्शन साईटचा बांबू ओव्हरहेड वायरवर पडला. अनेक प्रवाशांनी ट्रॅकवर उतरुन पायी चालत जाणं पसंत केले आहे. सकाळी ऐन कामावर पोहोचण्याच्यावेळी अशा घटना घडत असल्याने प्रवाशांमध्ये संतप्त भावना आहेत.

लोकल सेवा ही मुंबईची जीवन वाहिनी आहे. दररोज लाखो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. रोजच्या प्रवाशांचा आकडा 70 लाखाच्या पुढे आहे. मुंबईच्या एका टोकावरुन कर्जत-कसारा या दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी लोकल सेवा उत्तम पर्याय आहे. कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचता येते, म्हणून मुंबईकरांची पहिली पसंती लोकल सेवेला आहे. रस्ते मार्गापेक्षा रेल्वे मार्गाने प्रवास अधिक जलद होतो. पण मुंबईत लोकल प्रवास हा सहज, सोपा नाहीय. लोकल प्रवाशांच्या अनेक समस्या आहेत. पाऊस, ओव्हर हेड वायरच तुटणं, सिग्नल यंत्रणेत बिघाड याचा मोठा फटका लोकल प्रवाशांना सहन करावा लागतो.

मागच्या काही दिवसांपासून मुंबईत सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा वारंवार कोलमडली आहे. पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे लोकल विलंबाने धावतात. त्याचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागतो. मागच्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिट विलंबाने धावत असल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत. लोकलला नियोजित वेळेपक्षा काही मिनिट जरी उशिर झाला, तरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी उसळते. मग अशा खच्चून भरलेल्या गर्दीतून मुंबईकरांना प्रवास करावा लागतो.

आणखी वाचा : 

Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगे आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार

शरद पवार प्रकाश आंबेडकरांच्या व्हीबीएच्या 'आरक्षण बचाव यात्रे'त सहभागी होणार?

 

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!
Thane Metro : ठाणेकरांनो, तुमची प्रतीक्षा संपली! मेट्रो-4 डिसेंबरमध्ये सुरू होणार