मुंबई: नोव्हेंबरचा पहिलाच रविवार मुंबईकरांसाठी थोडा अडचणीचा ठरणार आहे. कारण उद्या म्हणजेच 2 नोव्हेंबर (रविवार) रोजी मुंबईतील मध्य रेल्वे, हार्बर लाईन आणि पश्चिम रेल्वे या तिन्ही मार्गांवर अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे पार पाडण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, या कामादरम्यान काही गाड्या रद्द करण्यात येतील, तर काहींच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रविवारी प्रवासाचं नियोजन करताना वेळापत्रक जरूर तपासावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.