आज, 8 डिसेंबर 2024 रोजी, मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रविवार असल्याने, अनेक मुंबईकर शहरात फिरण्याचे आणि शॉपिंगचे प्लॅन करत असतात. पण, जर तुमचा देखील असा काही प्लॅन असेल तर, मुंबई लोकलच्या वेळापत्रकाचा विचार करूनच घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण आज, मुंबईच्या तिन्ही मुख्य मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आले आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गांवर अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक लागू केला आहे.
आज, यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे, जर तुम्ही प्रवास करण्याची योजना करत असाल, तर मुंबई लोकलच्या वेळापत्रकाचे पुनरावलोकन करा. रेल्वेकडून प्रवाशांना मेगाब्लॉक दरम्यान होणाऱ्या असुविधा टाळण्यासाठी प्रवासाची वेळ पुन्हा तपासण्याचा सल्ला दिला आहे.
माटुंगा ते मुलुंड जलद मार्गावर सकाळी 11.30 ते 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
अप आणि डाऊन हार्बर मार्गावर CSMT ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी 11.10 ते 4.40 वाजेपर्यंत कार्यरत असणार.
यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटणाऱ्या जलद गाड्यांचा मार्ग धीम्या मार्गावर वळवला जाईल आणि गाड्या साधारणतः 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
CSMT वरून वाशी/बेलापूर/पनवेलच्या गाड्या सकाळी 11.16 ते 4.47 वाजेपर्यंत रद्द असतील.
तसेच CSMT वरून वांद्रे आणि गोरेगावच्या गाड्या सकाळी 10.48 ते 4.43 वाजेपर्यंत रद्द असतील.
पनवेल, बेलापूर, वाशी येथून CSMT कडे जाणाऱ्या गाड्या सकाळी 9.53 ते 3.20 वाजेपर्यंत रद्द राहतील.
पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष रेल्वे सेवा चालू राहतील.