भिवंडीत आगीचे रौद्ररुप, चार मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली

Vijay Lad   | ANI
Published : Apr 26, 2025, 08:04 PM IST
fire

सार

गेल्या १० तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. इमारत कोसळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून येथील संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे.

मुंबई ः ठाण्यातील भिवंडीत आगीची मोठी घटना घडली आहे. या आगीमुळे चार मजली इमारत कोसळली असून त्यात सुदैवाने जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अद्याप अग्नीशमन दलाला यश आलेले नाही. गेल्या १० तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. इमारत कोसळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून येथील संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे.

येथील राहनाळ गावात ही घटना घडली आहे. आधी फर्निचरच्या एका गोदामाला आग लागली होती. ती हळूहळू पसरत गेली. त्यानंतर आगीने १० ते १५ गोदामांना कवेत घेतले. त्यामुळे आग आणखी भडकली. आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी अग्नीशमन दलाच्या जवानांना माहिती दिली. त्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. आगीत मोठ्या प्रमाणावर फर्निचर साहित्य भष्यस्थानी पडले आहे.

गेल्या १० तासांपासून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. परंतु, अद्याप जवानांना यश आलेले नाही. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवताना अग्नीशमन दलाचा एक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्याची प्रकृती स्थीर असल्याची माहिती मिळाली आहे.

या आगाीमुळे परिसरात धुराचे मोठमोठे लोळ आकाशात उठले आहेत. सकाळी चारच्या सुमारास आग लागली होती. पाण्याच्या कमतरतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण जात आहे. इतर ठिकाणांहून पाण्याचे बंब आणले जात आहेत. या आगीत मोठी वित्तहानी झाल्याची माहिती मिळाली आहे.

PREV

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! 8–9 डिसेंबरला 24 तास पाणी कपात; 14 विभागांवर मोठा परिणाम
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!