Maharashtra Cabinet Meeting : उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मुदतवाढ, छ. संभाजीनगर, नागपूरच्या या योजनांसाठी कर्ज उभारणार

Published : Sep 09, 2025, 01:38 PM IST
Maharashtra Cabinet Meeting

सार

Maharashtra Cabinet Meeting: आज मंत्रालयात कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्याची माहिती जाणून घ्या.

मुंबई - आज मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ऊर्जा विभाग, नगरविकास विभाग, मृद व सलसंधारण विभाग आणि महसूल विभागाशी निगडित निर्णय घेण्यात आले.

(ऊर्जा विभाग)

शेतकऱ्यांना दिलासा. उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ. अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या १ हजार ७८९ योजनांना वीज दरात सवलतीमुळे शेतकरी सभासदांना लाभ.

(नगरविकास विभाग)

नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून २००० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मान्यता. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ८२२ कोटी रुपये, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चार मलनिस्सारण प्रकल्पासाठी २६८ कोटी रुपये, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ११६ कोटी रुपये कर्ज उभारणी करणार.

(मृद व जलसंधारण विभाग)

अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी (ता. मुर्तिजापूर) येथील लघु पाटबंधारे प्रकल्प योजनांच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यास मान्यता. मुर्तिजापूर तालुक्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार, शेतीला पाणी, शेतकऱ्यांना फायदा.

(महसूल विभाग)

रायगड जिल्ह्यातील मौजे आसुडगाव (ता. पनवेल) येथील शासकीय गायरानातील चार हेक्टर जमीन भारत सरकारच्या सब्सिडरी इंटेलिजन्स ब्युरो यांना अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता निवासस्थाने (रहिवास क्वार्टर्स) बांधण्यासाठी देण्यास मान्यता.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai : समोरून येणाऱ्या लोकल ट्रेनला पाहून महिलेचा चढला पारा, व्हायरल व्हिडिओ पाहून अनावर होईल राग
BMC Elections 2025 : महायुती असल्यास आमचाच महापौर; नसल्यास स्वतंत्र लढत – संजय गायकवाड