LPG Price Hiked: बजेटच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक LPG सिलिंडर 49 रुपयांनी महाग

Published : Feb 01, 2026, 10:53 AM IST
LPG Price Hiked

सार

LPG Price Hiked: 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या दरात 49 रुपयांची वाढ झाली आहे. याचा परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर खाद्य व्यावसायिकांवर होणार असून भविष्यात खाद्यपदार्थांच्या किमती वाढू शकतात.

LPG Price Hiked: कोची: सरकारी तेल कंपन्या (IOC, HPCL, BPCL) दर महिन्याच्या 1 तारखेला आंतरराष्ट्रीय दरांनुसार सिलिंडरच्या किंमत निश्चित करतात. त्यानुसार आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याआधी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 49 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, खानावळ, चहाची दुकाने, बेकरी आणि इतर व्यावसायिक कामांसाठी व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरला जातो. 19 किलो वजनाचे व्यावसायिक सिलेंडर निळ्या रंगाचे असतात, तर घरगुती सिलेंडर लाल रंगाचे (14.2 किलो) असतात.

व्यावसायिक वापराच्या LPG सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात 49 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सिलेंडरची किंमत 1 हजार 698 रुपयांवरून 1हजार 747 रुपये झाली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरिंग कंपन्या, बेकरी आणि छोटे खाद्य व्यावसायिक यांच्यावर होईल. आधीच वाढलेल्या खर्चाचा सामना करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी हा अतिरिक्त आर्थिक बोजा ठरणार आहे.

दरम्यान, घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 14.2 किलोच्या घरगुती LPG सिलेंडरच्या दरात सध्या कोणताही बदल झालेला नाही. सामान्य ग्राहकांसाठी हा एक दिलासादायक निर्णय मानला जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील बदल, आयातीचा खर्च आणि रुपयाचा विनिमय दर लक्षात घेऊन तेल कंपन्या वेळोवेळी व्यावसायिक LPG च्या दरात बदल करतात. गेल्या काही महिन्यांतही व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ आणि घट झाली आहे.

ही दरवाढ अशीच सुरू राहिल्यास हॉटेलमधील जेवणाचे दर वाढू शकतात आणि छोट्या खाद्य व्यावसायिकांना हा अतिरिक्त खर्च ग्राहकांवर लादावा लागू शकतो, असा इशारा व्यापारी संघटनांनी दिला आहे. दुसरीकडे, घरगुती सिलेंडरच्या दरात सवलत कायम राहिल्यास सामान्य कुटुंबांसाठी ही दिलासादायक बाब ठरेल.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : मुंबईत ८ महिने राहिल्यानंतर जपानी तरुणीने सांगितला अनुभव, व्हिडिओ व्हायरल
Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल