Ladki Bahin Yojana : १५०० की ३०००? ऑगस्टमध्ये लाडकी बहीण योजनेचे किती पैसे येणार?

Published : Aug 10, 2026, 07:13 PM IST
Ladki Bahin Yojana

सार

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेच्या आगामी हप्त्याबाबत अपडेट समोर आली आहे. जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार याबाबत विचारणा सुरू असताना आता खात्यात १५०० की ३००० येणार याची चर्चा सुरू आहे.

मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत अनेक महिलांमध्ये चर्चा आहे. जून महिन्याचा हप्ता १५ जुलै रोजी आला होता. तर आता जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार असा सवाल महिला वर्गातून विचारला जात आहे. याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या खात्यात येऊ शकतो, अशी शक्यता आहे.

जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपये खात्यात येतात. महिन्याच्या महिन्याला ही आर्थित मदत महिलांना दिली जाते. आता जुलै महिन्याचा हप्ता आठवडाभरात येण्याची शक्यता आहे.

ऑगस्टमध्ये येणार १५०० की ३००० रुपये?

दरम्यान, जून महिन्याचा हप्ता जुलैमध्ये आला. त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता अद्याप आलेला नाही. अशात आता १५ ऑगस्टपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता, १५०० रुपये खात्यात येऊ शकतात. दुसरीकडे अशीही शक्यता वर्तवली जातेय, की जुलैचा हप्ता १५ ऑगस्टपर्यंत आला नाही, तर जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी अर्थात १८ ऑगस्टला महिलांच्या खात्यात येऊ शकतो. म्हणजेच १८ ऑगस्टला जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही मिळून ३००० रुपये एकत्रच रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या खात्यात दिले जाऊ शकतात अशी शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा हप्ता

दरम्यान, आयकर विभागाकडून महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी भरलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. ज्या लाडक्या बहीण या योजनेसाठी पात्र नाहीत, त्यांना या योजनेतून वगळलं जाईल. तसंच लाडकी बहीण योजना अधिक पारदर्शक होण्यासाठी सरकारकडून ईकेव्हायसी करण्याचं सांगण्यात आलं. ईव्हायसी झाल्यानंतर तब्बल ८० लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या. त्यामुळे ज्या महिला अपात्र असतील, ईकेव्हायसी अपूर्ण असेल, तसंच कागदपत्रांच्या छाननीत अपात्र ठरल्या असतील, त्यांना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Virat Kohli Anushka Sharma : एकाच बिल्डिंगमध्ये विराट-अनुष्काचे 3 फ्लॅट्स, किंमत ऐकून थक्क व्हाल
Mumbai Greenery : परदेशी नागरिकाला मुंबईची भुरळ, शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कामगारांचं केलं कौतुक