Mumbai Railway Update : पश्चिम रेल्वेकडून जोगेश्वरी येथे एका नव्या लांब पल्ल्याच्या टर्मिनसची उभारणी केली जात आहे, ज्यामुळे दादर, वांद्रे आणि मुंबई सेंट्रलवरील प्रवाशांचा ताण कमी होण्यास मदत होईल.
Mumbai Railway Update : मुंबईतील लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेल आणि एक्सप्रेस गाड्या पकडण्यासाठी आता प्रवाशांना दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल किंवा वांद्रे टर्मिनसपर्यंत जाण्याची गरज भासणार नाही. पश्चिम रेल्वेकडून जोगेश्वरी येथे नव्या टर्मिनसची उभारणी सुरू असून, हे काम यावर्षाअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे.
25
जोगेश्वरी टर्मिनस का आहे महत्त्वाचा?
मुंबईत लांब पल्ल्याच्या प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही वाढ लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने जोगेश्वरी टर्मिनस उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नव्या टर्मिनसवरून दररोज 12 जोड्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या धावणार असून, यामध्ये दिल्ली व उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांचाही समावेश असेल. हा टर्मिनस अमृत भारत स्टेशन विकास योजनेअंतर्गत विकसित केला जात आहे.
35
कुठे उभारला जातोय हा टर्मिनस?
राम मंदिर आणि जोगेश्वरी स्थानकांदरम्यान रेल्वेच्या उपलब्ध जागेवर हा नवा टर्मिनस उभारण्यात येत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असल्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही हा टर्मिनस अत्यंत सोयीचा ठरणार आहे.
कामाची सध्याची स्थिती
सध्या टर्मिनसवरील
कव्हर शेड
प्लॅटफॉर्म
सर्व्हिस बिल्डिंग
स्टेशन इमारत
यांची कामे वेगाने सुरू आहेत. पुढील टप्प्यात रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 76.84 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यासाठी 51 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, मात्र विविध कारणांमुळे खर्चात वाढ झाली आहे. हा टर्मिनस 24 डब्यांच्या लांब पल्ल्याच्या गाड्या हाताळण्यास सक्षम असणार आहे.
55
मुंबईकरांना काय फायदा?
जोगेश्वरी टर्मिनस सुरू झाल्यानंतर
प्रमुख टर्मिनसवरील गर्दी कमी होईल
पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवास सोपा होईल
लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेळ आणि अंतर दोन्ही वाचेल