मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, सुमारे ५ किलोमीटरपर्यंत लागल्या रांगा

Published : May 01, 2025, 05:44 PM ISTUpdated : May 01, 2025, 05:46 PM IST
pune mumbai expressway

सार

देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्याला जोडणार्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचे समोर येत आहे.

मुंबई ः देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्याला जोडणार्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचे समोर येत आहे.

आडोशी बोगद्यालगत गॅस टॅन्कर आणि ट्रेलरचा अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे समजते. या अपघातामुळे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच महाराष्ट्र दिन, कामगार दिनाची सुटी असल्यानेही या मार्गावर आज वाहतूक जास्त होती. यासह उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या असल्यानेही वाहतुकीत भर पडली आहे.

खंडाळा घाट ते खालापूर या दरम्यान वाहतूक कोंडी जास्त असल्याचे सांगितले जात आहे. अमृतांजन पूल पार करण्यासाठी एका तासापेक्षा जास्त कालावधी लागत आहे.

सुट्या आणि वाहतूक कोंडी

शासकीय सुट्या किंवा विकेंड असला तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर नित्याचीच वाहतूक कोंडी दिसून येते. या मार्गावर मिसिंग लिंकचे काम सुरु आहे. त्यानंतर मुंबईहून पुण्याला जाणे सोपे होणार आहे. सध्या पुण्याला जायला सुमारे चार तास लागतात. त्यानंतर केवळ तीन तासांमध्ये पुण्याला पोहोचणे शक्य होणार आहे. तसेच एक्सप्रेस वेच्या दोन्ही बाजूंना एक लेन वाढवायची योजनाही आखण्यात आली आहे. त्यानंतर वाहतूक कोंडी कमी होताना दिसून येईल.

 

PREV

Recommended Stories

Mumbai Local : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! स्वयंचलित दरवाज्यांसह नव्या लोकल लवकरच धावणार, प्रवास होणार अधिक सुरक्षित
मुंबईत सर्वाधिक CO₂ उत्सर्जन; दिल्ली, पुणे, बंगळूरमध्येही धोकादायक पातळी!