मुंबईत सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख १६ हजारांच्या घरात, या कारणामुळे झाली वाढ

Vijay Lad   | ANI
Published : Apr 21, 2025, 08:56 PM ISTUpdated : Apr 21, 2025, 08:58 PM IST
Gold

सार

आज सोमवारी सोन्याने १ लाख रुपयांचा ऐतिहासिक टक्का गाठला आहे. एक तोळा सोने आणि त्यावरील जीएसटीची रक्कम गृहित धरली तर मुंबईत सोने १ लाख १६ हजार रुपयांवर गेले आहे.

मुंबई ः अमेरिकेने चीनवर अव्वाच्या सव्वा टॅरीफ लावल्याने दोन्ही देशांमध्ये व्यापार युद्ध सुरु झाले आहे. त्याचा परिणाम आता दिसायला सुरवात झाली आहे. 

आज सोमवारी सोन्याने १ लाख रुपयांचा ऐतिहासिक टक्का गाठला आहे. एक तोळा सोने आणि त्यावरील जीएसटीची रक्कम गृहित धरली तर मुंबईत सोने १ लाख १६ हजार रुपयांवर गेले आहे.

पुण्यात सोन्याचा दर जीएसटी धरुन प्रति तोळा सुमारे ९९ हजार १०० रुपयांवर गेला आहे. तर कोल्हापुरात तो ९९ हजार ६०० रुपयांवर गेला आहे. छ. संभाजीनगरातही ही भाववाढ दिसून येत आहे. 

सोन्याचा दर ९९ हजार ५०० वर गेला आहे. जळगावात सोन्याचा दर ९९ हजार ६०० दिसून येत आहे. तर सोलापुरात ९६ हजार ७०० रुपयांवर पोहोचला आहे.

अमेरिकेने इतर देशांवर टॅरिफ लावल्याने सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या या टॅरिफला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही भाववाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, टॅरीफ प्रत्यक्ष अंमलात आल्यावर आणखी भाववाढ होण्याची शक्यता आहे.

----------------------------

PREV

Recommended Stories

Mumbai Local : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! स्वयंचलित दरवाज्यांसह नव्या लोकल लवकरच धावणार, प्रवास होणार अधिक सुरक्षित
मुंबईत सर्वाधिक CO₂ उत्सर्जन; दिल्ली, पुणे, बंगळूरमध्येही धोकादायक पातळी!