Gate Way Boat Accident : पीडितांना मिळणार 2 लाखांची मदत, वाचा आतापर्यंत काय घडले

गेटवे वरुन एलिफंटाला जाणाऱ्या बोटीचा अपघात घडल्याच्या प्रकरणात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या या दुर्घटनेत बोट मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gate Way Boat Accident  Updates : मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रात बोट बुडाल्याची दुर्घटना 18 डिसेंबरला घडली. या दुर्घटनेत 13 जणांना मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तींमध्ये सात पुरुष, चार महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. बोटीमधील पर्यटकांना गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटा येथे नेण्यात येत होते.

काय घडले?

गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने निघालेल्या बोटीची जहाजाला धडक बसली गेली. दुर्घटनेनंतर बोटीमधील सर्वजण आक्रोश करू लागले. बोट उलटी झाल्याने समुद्रात बुडालेल्या व्यक्तींचे तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. यामध्ये जवळजवळ 101 व्यक्तींना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. पण 13 व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आतापर्यंत काय घडले...

आणखी वाचा : 

मुंबईतील नीलकमल बोट अपघात: १३ जणांचा मृत्यू, बोट मालकावर गुन्हा दाखल होणार

मुंबईहून एलिफंटाला जाणारी बोट बुडाली; कसा झाला अपघात? व्हिडीओ!

Share this article