Disha Salian Death Case : दिशा सालियन प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, आदित्य ठाकरेंना दिलासा?

Published : Jul 03, 2025, 09:40 AM ISTUpdated : Jul 03, 2025, 09:44 AM IST
disha salian and aditya thackeray

सार

मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणात एक मोठा निर्णय सुनावला आहे. उच्च न्यायालयाने निर्णयात आदित्य ठाकरे यांना दिलासा दिला आहे. याशिवाय रिपोर्टमध्ये लैंगिक शोषण किंवा शारीरिक दुखापतीचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. 

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने वर्ष 2020 रोजी दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणात निर्णयाची सुनावणी केली आहे. यामध्ये संशयाला वाव नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या माजी व्यवस्थापकाने ८ जून २०२० रोजी मालाड (पश्चिम) येथील इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारल्याचा आरोप आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी आपल्या मुलीला न्याय मिळण्याची मागणी केली होती. याशिवाय शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा आग्रह केला होता.

दिशाच्या वडिलांनी त्यांच्या मुलीला न्याय मिळण्याची मागणी करत न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेला विरोध दर्शवला. त्यांनी म्हटले की, दिशासोबत अत्यंत क्रूरपणे बलात्कार करण्यात आला. तिची हत्या करण्यात आली आणि राजकीय रुपात हे लपवण्यात आले. याशिवाय प्रकरणाचा तपास SIT आणि CBI कडे द्यावा असेही म्हटले होते. एवढेच नव्हे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचा आग्रह केला होता.

बलात्काराचे पुरावे नाहीत

मालवणी पोलीस स्थानकाकडून दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत म्हटले की, दिशाच्या वडिलांनी केलेले आरोप योग्य नाहीत. दिशासोबत कोणत्याही प्रकारचा बलात्कार झालेला नाही. वैद्यकीय रिपोर्ट आणि तपासात देखील हे सिद्ध झाले आहे. दिशाच्या वडिलांनी आरोप लावला होता की, पोलीस या प्रकरणात काहीतरी लपवत आहेत. याशिवाय एका बड्या राजकीय नेत्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करतेय. या प्रकरणाचा तपास एसआयटी करत होती. यानंतर दिशाच्या वडिलांनी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी केली होती. दिशाचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर या प्रकरणावरुन काही आरोप लावण्यात आले होते.

दबावाखाली होती दिशा

दिशाच्या मित्रांनी म्हटले की, ती तिच्या परिवारासोबतच्या वादामुळे मानसिक तणावाखाली होती. कारण तिच्याकडून व्यावसायिक डील झाली नव्हती. याशिवाय मृत्यूपूर्वी दिशा खूप मद्यधूंद अवस्थेत होती. याची पुष्टी फॉरेंसिक सायन्स लॅबकडून करण्यात आली आहे. उत्तरात असे म्हटले आहे की, मृत्यूच्या रात्री तिच्या सर्व मित्रमैत्रींचा जबाब एकसमान होता. यामध्ये म्हटले की, अशा सर्व दबावाच्या परिस्थितीमुळे दिशाने आपल्या मर्जीने खिडकीमधून उडी मारत आत्महत्या केली.

दोन आठवड्यानंतर सुनावणी

आदित्य ठाकरे यांनी सुनावणीसाठी हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. आदित्य यांनी म्हटले की, या आदेशांमध्ये त्यांच्यावर प्रतिकूल प्रभाव पडेल. याशिवाय सतीश यांनी विरोधकांनी लावलेले आरोप खोटे, निराधार आणि ऐकलेले असण्यासह मीडिया ट्रायवर विश्वास ठेवलेले आहेत. उच्च न्यायालयात पुढील दोन आठवड्यात सुनावणी पुन्हा पार पडणार आहे.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! 8–9 डिसेंबरला 24 तास पाणी कपात; 14 विभागांवर मोठा परिणाम
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!