या शाळेत प्रत्येक वर्गाची फी वेगळी आहे. इंटरनॅशनल बोर्डाकडे गेल्यावर फी वाढते. 8 वी ते 10 वीसाठी केंब्रिज IGCSE आणि 11 वी-12 वीसाठी IB डिप्लोमा प्रोग्राम आहे. यासाठी खास ट्रेनिंग घेतलेले शिक्षक, प्रोजेक्ट्स आणि एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज असतात, त्यामुळे फी जास्त असते.
अभ्यासासोबतच इतर गोष्टींसाठी शाळेत भारी सुविधा आहेत.
क्लासरूम आणि लॅब: 1.3 लाख स्क्वेअर फुटांचा कॅम्पस, 60 पेक्षा जास्त एसी क्लासरूम आणि सायन्स लॅब आहेत.
लायब्ररी: 40,000 पेक्षा जास्त पुस्तके आणि डिजिटल बुक्स उपलब्ध आहेत.
कला आणि संगीत: आर्ट, म्युझिक, भाषा आणि कॉम्प्युटरसाठी खास खोल्या आहेत. कार्यक्रम करण्यासाठी खास जागाही आहे.
खेळ: 2.3 एकरांचं मैदान, बास्केटबॉल, टेनिस, व्हॉलीबॉल कोर्ट आणि योगा रूम आहे.
इतर सुविधा: मेडिकल सेंटर, ऑडिओ-व्हिज्युअल ऑडिटोरियम आणि दोन डायनिंग हॉल आहेत, जिथे शाकाहारी जेवण आणि स्नॅक्स मिळतात.