CJP Protest : दादर येथील चैत्यभूमीजवळील आंदोलनकर्त्यांविरोधात मुंबई पोलिसांकडून कारवाई, तीन गुन्हे दाखल

Published : Jul 21, 2026, 02:25 PM IST
Dadar Protest

सार

नीट पेपरफुटी प्रकरणात कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अशातच दादर येथील चैत्यभूमीवरील आंदोलनावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई : दादर येथे सीजेपीच्या आंदोलकांनी नीट पेपरफुटीविरोधात आंदोलक पुकारले होते. या आंदोलनाचे फोटो-व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यामधील एका महिलेचा व्हिडीओही समोर आला होता. अशातच आता मुंबई पोलिसांकडून आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीजेपीच्या आंदोलकांनी आंदोलन करण्यासाठी कोणतीही संबंधित परवानगी घेतली नव्हती. यामुळे आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली गेली आहे. याशिवाय प्रकरणात 50 हून आंदोलकांच्या विरोधात कारवाई केली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नक्की काय घडले?

उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना 18 जुलैला दिल्ली पोलिसांनी उचलून रुग्णालयात नेले. याशिवाय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजनीम्याच्या मागणी आंदोलकांनी केली. यामुळेच दादर येथील चैत्यभूमीवर आंदोलन छेडण्यात आले. पोलिसांच्या सूत्रांनुसार, सदर आंदोलनाविरोधात संविधानच्या वेगवेगळ्या कायद्याअंतर्गत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिल्लीत आंदोलनाला हिंसक वळण

दिल्लीत काल विधानभवानाकडे निघालेल्या सीजेपीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले गेले. यामध्ये दगडफेक आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. याशिवाय दुकानांचेही नुकसान करण्यात आले. या प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या पोलिसांकडून स्थानिक सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले जात आहे. यामधील आंदोलकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तर आजही कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्यासह आंदोलक आंदोलन करण्यासाठी पोहोचले आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Raj Thackeray : सरकारने निर्दयीपणा सोडून... दिल्लीतील लाठीचार्जनंतर राज ठाकरेंची सरकारवर टीका
Devendra Fadnavis : दिल्लीत आंदोलकांवर लाठीचार्ज; देवेंद्र फडणवीस म्हणाले, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गरजेचा होता