BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार असून, बंडखोर उमेदवारांची नाराजी दूर करण्यासाठी सर्व पक्ष शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नशील आहेत.
BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (1 जानेवारी) शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहे. या निवडणुकीत बंडखोर उमेदवारांमुळे पक्षाला फटका बसू नये यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्ष शेवटच्या क्षणापर्यंत अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मनधरणी करताना दिसत आहेत.
बंडखोरी ठरणार की माघार? राजकीय घडामोडींना वेग
अर्ज माघारीची मुदत संपेपर्यंत कोणकोणते बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचे वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
ठाकरे-मनसे युतीतील बंडखोर उमेदवारांची यादी
मुंबईत शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसे युतीतून काही उमेदवारांनी बंडखोरी केल्याचे समोर आले आहे. संबंधित बंडखोर उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत —
प्रभाग क्रमांक ९५ – चंद्रशेखर वायंगणकर, ठाकरे
(अधिकृत उमेदवार: हरी शास्त्री – ठाकरे)
प्रभाग क्रमांक १०६ – सागर देवरे, ठाकरे
(अधिकृत उमेदवार: सत्यवान दळवी – मनसे)
प्रभाग क्रमांक ११४ – अनिशा माजगावकर, मनसे
(अधिकृत उमेदवार: राजोल पाटील – ठाकरे)
प्रभाग क्रमांक १६९ – कमलाकर नाईक, ठाकरे
(अधिकृत उमेदवार: प्रवीणा मोरजकार – ठाकरे)
प्रभाग क्रमांक १९३ – सूर्यकांत कोळी, ठाकरे
(अधिकृत उमेदवार: हेमांगी वरळीकर – ठाकरे)
प्रभाग क्रमांक १९६ – संगीता जगताप, ठाकरे
(अधिकृत उमेदवार: पद्मजा चेंबूरकर – ठाकरे)
प्रभाग क्रमांक २०२ – विजय इंदुलकर, ठाकरे
(अधिकृत उमेदवार: श्रद्धा जाधव – ठाकरे)
प्रभाग क्रमांक २०३ – दिव्या बडवे, ठाकरे
(अधिकृत उमेदवार: भारती पेडणेकर – ठाकरे)
प्रभाग क्रमांक १९७ – श्रावणी देसाई, ठाकरे
(अधिकृत उमेदवार: रचना साळवी – मनसे)
भाजपमधील बंडखोरीने वाढवली डोकेदुखी
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपलाही बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. भाजपमधील उमेदवार आणि बंडखोरांची यादी पुढीलप्रमाणे —