Dharavi Redevelopment : धारावीचा चेहरामोहरा बदलणार! अदानी ग्रुपकडून माटुंग्यात 10,432 घरांच्या बांधकामाला सुरुवात

Published : Oct 13, 2026, 12:23 PM IST
Dharavi Redevelopment : धारावीचा चेहरामोहरा बदलणार! अदानी ग्रुपकडून माटुंग्यात 10,432 घरांच्या बांधकामाला सुरुवात

सार

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील रहिवाशांसाठी अदानी ग्रुपने माटुंग्यात १०,४३२ घरांचं बांधकाम सुरू केलं आहे. २२ एकरांवर उभ्या राहणाऱ्या या भव्य प्रकल्पातून पात्र रहिवाशांना ३५० चौरस फुटांची घरं मिळतील.

मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा आता कायापालट होणार आहे. धारावीतील रहिवाशांसाठी अदानी ग्रुपने माटुंग्यातील २२ एकर जागेवर १०,४३२ पुनर्वसन घरांच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. अदानी एंटरप्रायजेसचे संचालक प्रणव अदानी यांच्या हस्ते सोमवारी या प्रकल्पस्थळी भूमिपूजन पार पडलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी (DRP) स्थापन करण्यात आलेली 'अदानी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड' (ANDPL) ही स्पेशल पर्पज व्हेईकल (SPV) कंपनी हा प्रकल्प राबवत आहे.

या प्रकल्पांतर्गत १० टॉवर्समध्ये १०,४३२ फ्लॅट्स आणि १,३७९ व्यावसायिक-औद्योगिक युनिट्स बांधले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) आणि अदानी ग्रुप संयुक्तपणे हा प्रकल्प पूर्ण करत आहेत.

भूमीपूजनानंतर बोलताना प्रणव अदानी म्हणाले की, प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित भविष्य आणि चांगलं जीवनमान देणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. या प्रकल्पातून पात्र रहिवाशांना ३५० चौरस फुटांची हक्काची घरं मिळतील. सर्वात आधी धारावीतील सेक्टर ६ आणि सेक्टर १ मधील रहिवाशांना ही घरं दिली जातील. त्यानंतर प्राधान्यक्रमाने सुमारे ४,५०० कुटुंबांना इतर फ्लॅट्सचं वाटप केलं जाईल.

हे सर्व टॉवर्स तीन टप्प्यांत महाराष्ट्र सरकारच्या DRP/SRA विभागाकडे सुपूर्द केले जातील. पहिले पाच टॉवर्स मार्च २०२९ पर्यंत, पुढचे दोन टॉवर्स ऑगस्ट २०२९ मध्ये आणि उरलेले तीन टॉवर्स ऑगस्ट २०३० पर्यंत पूर्ण करून दिले जातील. हे टॉवर्स ३७ ते ३९ मजल्यांचे असतील. यात १० ते १२ पॅसेंजर लिफ्ट्स आणि दोन फायर लिफ्ट्सची सुविधा असेल. याशिवाय, बालवाडी, कम्युनिटी हॉल, पोडियम गार्डन आणि प्रार्थनास्थळांसारख्या सर्व आधुनिक सोयीसुविधा या इमारतींमध्ये असतील.

इमारती आणि सार्वजनिक सुविधांच्या देखभालीसाठी १० टक्के व्यावसायिक जागा राखून ठेवली जाईल, अशी माहिती अदानी नवभारत डेव्हलपर्सच्या अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे, घरांचं वाटप झाल्यानंतर पुढची १० वर्षे कंपनी स्वतः या इमारतींची देखभाल करणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध शहर नियोजन तज्ज्ञांनी या भव्य प्रकल्पाचं डिझाईन तयार केलं आहे. यामुळे धारावीकरांचं राहणीमान तर सुधारेलच, पण स्थानिक रोजगारालाही चालना मिळेल.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Old Monk FSSAI Dispute : 'ओल्ड मंक'ला आता 'रम' म्हणता येणार नाही? FSSAI च्या अटीमुळे कंपनीला 500 कोटींचा फटका
Virat Kohli Anushka Sharma : एकाच बिल्डिंगमध्ये विराट-अनुष्काचे 3 फ्लॅट्स, किंमत ऐकून थक्क व्हाल