ZP Elections and Panchayat Samiti Election Results 2026 : महायुतीचा दबदबा, बिनविरोध विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर

Published : Feb 09, 2026, 09:14 AM IST
bmc election results 2026 shiv sena ubt vs eknath shinde mayor politics

सार

ZP Elections and Panchayat Samiti Election Results 2026 : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. 

ZP Elections and Panchayat Samiti Election Results 2026 : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये (Zilla Parishad And Panchayat Samiti Election Result 2026) कोणाची सत्ता येणार, कोण बाजी मारणार आणि कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार, याचा अंतिम फैसला आज होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी आज सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार असून, निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

आज मतमोजणी; काही तासांत चित्र स्पष्ट

शनिवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषदांच्या 731 जागा आणि पंचायत समितींच्या 1,462 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. साधारण चार ते पाच तासांत बहुतेक ठिकाणी निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा यात समावेश आहे.

7,438 उमेदवार मैदानात; 25 जागा बिनविरोध

या निवडणुकीत एकूण 7,438 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. मात्र, मतमोजणीपूर्वीच महायुतीच्या तब्बल 25 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी निकालापूर्वीच महायुतीने आघाडी घेतल्याचं चित्र आहे.

कोकणात महायुतीचा दबदबा

कोकण विभागात महायुतीने मोठं यश मिळवलं असून तब्बल 27 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत 8 आणि पंचायत समितीत 17 जागा महायुतीने बिनविरोध जिंकल्या आहेत. 50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 7 आणि शिंदे शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध विजयी ठरला आहे. पंचायत समितीतील 100 जागांपैकी भाजपचे 16 आणि शिंदे शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध निवडून आला आहे.

रायगड–रत्नागिरीतही बिनविरोध विजय

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतूनही शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. महाड पंचायत समितीतील सवाने-धामणे गणातून शिंदे शिवसेनेचे अनिल जाधव बिनविरोध विजयी झाले आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज पंचायत समिती गणातून डॉ. पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सिंधुदुर्गात भाजप–शिंदे सेनेचा वरचष्मा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजप व शिंदे शिवसेनेने मोठा प्रभाव दाखवला आहे. कणकवली, देवगड, वैभववाडी, वेंगुर्ले, मालवण, सावंतवाडी आणि दोडामार्ग पंचायत समित्यांमध्ये अनेक जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

महायुतीच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद (8 जागा – बिनविरोध)

1. खारेपाटण – प्राची इस्वालकर (भाजप)

2. बांदा – प्रमोद कामत (भाजप)

3. जाणवली – रुहिता राजेश तांबे (शिवसेना – भाजप समर्थित)

4. पडेल – सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)

5. बापर्डे – अवनी अमोल तेली (भाजप)

6. पोंगुर्ले – अनुराधा महेश नारकर (भाजप)

7. किंजवडे-सावी – गंगाराम लोके (भाजप)

8. कोळपे – प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप)

पंचायत समिती – कणकवली (6 जागा – बिनविरोध)

1. वरवडे – सोनू सावंत (भाजप)

2. नांदगाव – हर्षदा हनुमंत वाळके (भाजप)

3. जाणवली – महेश्वरी महेश चव्हाण (भाजप)

4. बिडवाडी – संजना संतोष राणे (भाजप)

5. हरकुळ बुद्रुक – दिव्या दिनकर पेडणेकर (भाजप)

6. नाटळ – सायली संजय कृपाळ (भाजप)

पंचायत समिती – देवगड (6 जागा – बिनविरोध)

1. पडेल – अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)

2. नाडण – गणेश सदाशिव राणे (भाजप)

3. बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)

4. फणसगाव – समृद्धी संतोष चव्हाण (भाजप)

5. शिरगाव – शीतल सुरेश तावडे (भाजप)

6. कोटकामते– ऋतुजा राकेश खाजनवाडकर (भाजप)

पंचायत समिती – वैभववाडी (1 जागा – बिनविरोध)

1. कोकिसरे – सौ. साधना सुधीर नकाशे (भाजप)

पंचायत समिती – वेंगुर्ले (1 जागा – बिनविरोध)

1. आसोली – संकेत धुरी (भाजप)

पंचायत समिती – मालवण (1 जागा – बिनविरोध)

1. अडवली मालडी – सीमा सतीश परुळेकर (भाजप)

पंचायत समिती – सावंतवाडी (1 जागा – बिनविरोध)

  1. शेरले – महेश धुरी (भाजप)

पंचायत समिती – दोडामार्ग (1 जागा – बिनविरोध)

1. कोलझर – गणेश प्रसाद गवस (शिंदे शिवसेना)

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

ZP Elections and Panchayat Samiti Election Results 2026 : ‘मिनी मंत्रालय’चा फैसला आज; जिल्हा परिषद–पंचायत समिती निकालाकडे राज्याचं लक्ष
Samruddhi Mahamarg: नागपूर ते मुंबई आता 'सुपरफास्ट'! भिवंडीत नवा ८ पदरी हायवे; तासाभराचा प्रवास मिनिटांत, पाहा नवा प्लॅन