Operation Tiger | शिवसेनेचे 4 खासदार मातोश्रीवर उपस्थित, तर 5 ऑनलाईन उपस्थित

Published : Jun 14, 2026, 03:55 PM ISTUpdated : Jun 14, 2026, 04:14 PM IST
Shiv Sena leader Sanjay Raut

सार

उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला ३ खासदार गैरहजर असल्याची चर्चा होती, मात्र संजय राऊत यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे की, काही खासदार प्रत्यक्ष तर काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते, त्यामुळे सर्व नऊ खासदार बैठकीला हजर होते.

मागील गेल्या अनेक दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु होती. अखेर आज मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी सर्व खासदारांची बैठक पार पडली. त्या बैठकीला ३ खासदार गैरहजर राहिले. याबाबत संजय राऊत यांनी बैठकीची माहिती.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना सर्व घटनेची माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला खासदार अरविंद सावंत, खासदार संजय दिना पाटील, खासदार अनिल देसाई, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाझे हे प्रत्यक्ष उपस्थित होते. यावेळी उरलेले पाच खासदार हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे मीटिंगला जॉईन झाले होते.

ऑनलाईन कोण झालं जॉईन?

यावेळी ऑनलाईन भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर, नागेश आष्टीकर, संजय देशमुख हे ऑनलाईन कॉन्फरन्सिंगद्वारे जॉईन झाले होते. नऊच्या नऊ खासदार हे बैठकीला उपस्थित होते असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं. काही खासदार हे बैठकीला उपस्थित राहिले नाही, ते पुढील ३ दिवसांमध्ये मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतील असं राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी सर्व खासदार बैठकीला उपस्थित होते असं सांगितलं. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ऑपरेशन टायगर लवकरच राबवलं जाईल असं सांगितलं होत. त्यानंतर आता सर्वच खासदार उपस्थित राहिल्यामुळं नेमकं काय होणार याकडं लोकांचं लक्ष लागून राहील आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Shivsena MP : 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांना बळ; ठाकरेंचे इतके खासदार नॉटरिचेबल?
SHARAD PAWAR : शरद पवार भाजपसोबत जाणार? रामदास आठवलेंची मोठी ऑफर