मुंबई आणि ठाण्यात आज पाऊस पडणार? महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये होणार अतिवृष्टी

Published : Oct 30, 2025, 09:33 AM IST

महाराष्ट्रात बंगालमधील वादळामुळे सुरू असलेला पाऊस आता थांबणार आहे. मुंबई, ठाणे, आणि कोकणात पावसाचा जोर ओसरला असून हवामान स्थिर झाले आहे, तर पालघरमध्ये हलक्या पावसाचा अंदाज कायम आहे.

PREV
16
मुंबई आणि ठाण्यात आज पाऊस पडणार? महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये होणार अतिवृष्टी

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत असून आता तो थांबणार असल्याचं दिसून येत आहे. बंगालमधील वादळामुळे ऑक्टोबरच्या अखेरीसही पावसाचा जोर कायम राहिला.

26
कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी होणार?

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोर ओसरणार आहे. आठवडाभर यलो अलर्ट असलेल्या या भागांत आज म्हणजेच 30 ऑक्टोबर 2025 रोजी हवामान विभागाने पावसाचा कोणताही इशारा दिलेला नाही.

36
मुंबई शहरात अधूनमधून पडतोय पाऊस

मुंबई शहरात अधूनमधून पाऊस पडत आहे. आकाशात हलके ढग असून पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. दक्षिण मुंबईपासून उपनगरांपर्यंत हवामान दमट राहील, पण मुसळधार सरींची शक्यता नाही. तापमान थोडं वाढलेलं जाणवेल, मात्र वातावरण स्थिर राहील.

46
ठाणे आणि नवी मुंबई परिसरात येलो अलर्ट

ठाणे आणि नवी मुंबई परिसरात येलो अलर्ट जरी करण्यात आला आहे. आता हवामान मोकळं झालं असून कोणत्याही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला नाही. पुढील दोन दिवस अतिशय कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

56
पालघर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी

पालघर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून पालघरमध्ये अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत.

66
कोकणात हवामान झालं स्थिर

कोकणात हवामान स्थिर झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, या भागात हलकी ढगाळ हवा आणि अधूनमधून सूर्यप्रकाश दिसेल.

Read more Photos on

Recommended Stories