
राज्यातील काही भागांमध्ये ३ दिवस तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाळा पोषक असं वातावरण तयार झालं आहे. त्यानंतर मात्र दोन दिवस पावसाची उघडीप राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं कुठं पाऊस पडणार त्याबद्दल माहिती दिली.
हवामान विभागानं यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह पाऊस पडेल असं सांगण्यात आलं आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळं हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. उद्या राज्यातील इतर भागांमध्ये चांगला पाऊस पडू शकतो. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह पाऊस पडणार आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलका पाऊस पडू शकतो.