आज ओबीसी आणि मराठा यांच्यात भांडण लावून दिलेत, लक्ष्मण हाके असं का म्हणाले?

Published : Jun 30, 2026, 10:11 PM IST
laxman hake

सार

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बीडमधील हत्याकांडावर भाष्य केले आहे. खासदार पुत्राचा सहभाग असल्याच्या आरोपांमुळे पोलीस राजकीय दबावाखाली कारवाई टाळत आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि पोलिसांनी आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी, अशी मागणी त्यांनी केली.

सध्याच्या काळात राजकारणात कधी कोण टीका करेल ते सांगता येत नाही. यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रोहित पवार यांनी टीका केली आहे. बीड जिल्ह्यातील हत्या झालेल्या तरुणाच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. बजरंग सोनावणे यांच्या मुलाचा या हत्याकांडात सहभाग आहे का नाही हे पोलीस ठरवतील. पोलिसांनी त्यांची जबाबदारी योग्य रीतीने पार पडायला हवी.

खासदार पुत्र आहे म्हणून कारवाई टाळू नका 

खासदार पुत्राचा गुन्ह्यात सहभाग आहे म्हणून पोलिसांनी कारवाई टाळू नये. पोलीस खरंच राजकीय दबावाखाली काम करत आहेत का असा प्रश्न आम्हाला पडला आहे. मी कोणावरही मोगम आरोप करत नाही. बीडमध्ये एखाद्याची हत्या झाल्यानंतर आंदोलन करणं आणि त्याच्या समर्थनार्थ मोर्चा निघणं कायमच झालंय असं यावेळी बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

आमच्या मागण्या आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय 

आमच्या मागण्या मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय असं यावेळी बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं बोलणं व्यवस्थेनं ऐकून घ्यायला हवं. बीड जिल्ह्यात हि हत्या झाली असून हे पोलिसांचं फेल्युअर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीशिवाय दुसरं काहीही चालू नसल्याचं हाके यांनी यावेळी म्हटलंय.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

खासदार श्रीकांत शिंदे यांचाही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
आमच्या पक्षाचे खासदार फुटणार नाही, रोहित पवार यांनी केला दावा